छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री राधिका मदन (Radhika Madan) आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. राधिकाने फार कमी वयातच अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. पण आपल्या कौशल्याच्या आधारावर आज सिनेसृष्टीत तिने आपली एक ओळख निर्माण केली आहे. मात्र, या प्रवासादरम्यान तिला फार संघर्ष करावा लागला. याचा खुलासा राधिकाने स्वतः एका मुलाखतीत केला.
राधिकाने तिच्या पहिल्या डेब्यू चित्रपटादरम्यानचा एक किस्सा सांगताना म्हटले की, ‘माझा चित्रीकरणाचा पहिला दिवस होता. आणि चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी मला गर्भनिरोधक गोळी खरेदी करावी लागली होती. जेव्हा मला दिग्दर्शकांनी गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pill) खरेदी करण्यास सांगितले होते तेव्हा मी हैराण झाले होते. मात्र, तो माझ्या चित्रीकरणाचा पहिला शॉट असल्याने मला ती गोळी घ्यावी लागली’.
राधिकाने पुढे सांगितले की, त्यावेळी ‘माझे आई-वडिल मला सरप्राईज देण्यासाठी घरी पोहोचले होते. त्यांना पाहून मी खूपच खुश झाले. पण जेव्हा त्यांनी घरात त्या गोळ्या पाहिल्या तेव्हा त्यांना जरा धक्काच बसला. कारण हे सर्व त्यांच्यासाठी धक्कादायक होतं. माझे वडिल त्या गोळ्यांकडे फक्त बघत राहिले पण काही बोलले नाही’.
यावेळी राधिकाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत बोलताना तिने खूप संघर्ष केल्याचे सांगितले. तिने म्हटले की, सिनेसृष्टीत ओळख मिळवण्यासाठी मी खूप मेहनत केली. अनेकवेळा मला ऑडिशनमध्ये नकार देण्यात आले. एकदा तर एका दिग्दर्शकाने मला सुंदर नसल्याचे सांगत चित्रपटातून काढून टाकले. पण मी हार मानले नाही’.
राधिकाने ‘पटाखा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण तिने ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटात सुरुवातीला काम केले होते. याबाबत बोलताना राधिकाने सांगितले की, सर्वांना वाटते की, मी ‘पटाखा’ या चित्रपटाचे सुरुवातीला चित्रीकरण केले. पण मी पटाखा नाही तर ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटाचे पहिल्यांदा चित्रीकरण केले होते’.
राधिकाने म्हटले की, ‘मी साजिद अली यांच्या लैला मजनू या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले होते. तिथे एकाने मला विचारले की, तुला अॅक्शन करता येतं का? तेव्हा मी सांगितले की, मी डान्स करू शकते. त्यानंतर त्यांनी मला एका खोलीत नेले आणि अॅक्शन सीन करून दाखवण्यास सांगितले. त्यानंतर साजिद सरांना न भेटताच वासन सरांनी मला ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटासाठी साईन केले’.
दरम्यान, राधिकाने ‘पटाखा’, ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटात काम केली असली तरी तिला ‘हिंदी मीडियम’ चित्रपटामुळे जास्त ओळख मिळाली. या चित्रपटात तिने इरफान खान यांच्या मुलीची भूमिका साकारती होती. आपल्या या भूमिकेद्वारे राधिकाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले.
महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! लतादीदींची प्रकृती बिघडली, पुन्हा ठेवण्यात आले व्हेंटिलेटरवर, डॉक्टर म्हणाले..
‘आपकी इज्जत एक बार गई तो गई, हम तो रोज रातको बेचतेही है, खतम ही नही होती’
महाशिवरात्रीला येणार अमृता फडणवीसांचं नवं गाणं, चाहत्यांची उत्सुकता शिगेला….