संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ७ व्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरुन मोदींनी काँग्रेसवर टीका केली होती. कोरोनाच्या काळात मुंबईतल्या युपी आणि बिहारी लोकांना पैसे देऊन घरी जायला सांगितलं. तुमच्या राज्यात जाऊन कोरोना पसरवा असं सांगितलं, असा आरोप नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला आहे. (radhakrushna vikhe patil on supriya sule)
नरेंद्र मोदींच्या या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला सुपरस्प्रेडर संबोधल्याबद्दल सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्याराज्यांमध्ये तुम्ही भांडण का लावून देत आहात? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
आता सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर आता भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. काँग्रेसच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसलेला विसरलात का? असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला आहे. तसेच साखर कारखान्यांवरही भाष्य केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्व इतिहास जागृत करायला हवा… राजीव गांधीमुळे तुम्हाला पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपद दिले. त्याच काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही वेगळा पक्ष काढला हे तुम्ही विसरलात का? राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या झालेल्या विक्रीबाबत त्यांनी बोलले पाहिजे, असेही विखे पाटलांनी म्हटले आहे.
खा. @supriya_sule यांनी पूर्व इतिहास जागृत करायला हवा…
राजीव गांधीमुळे तुम्हाला पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपद दिले. त्याच काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही वेगळा पक्ष काढला हे तुम्ही विसरलात का? 1/2— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) February 8, 2022
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्या म्हणाल्या की, कोविडच्या काळात लोकांनी एकमेकांना धावून धावून मदत केली. मला कोरोना काळात कोणीतरी एक फोटो मला पाठवला होता. एक महिला होती आणि तिच्या मागे बॅग होती. त्यावर मुलं झोपलेले होते आणि वडिल बॅग ओढत होते. तिथे लिहिलेले होते. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैराण हूँ मैं.
तसेच मला नरेंद्र मोदींना तेच विचारायचं आहे. माननीय मोदीजी तुमसे नाराज नहीं हैराण हूँ मैं आपसे. आम्ही सुपरस्प्रेडर आहोत, असं कसं बोललात. त्यांनी थोडाही शास्त्रीय आरोप केला असता, तरी मी कबूल केला असता. मी केवळ टीका करायची म्हणून करत नाहीये. मी महाराष्ट्राची कन्या म्हणून त्यांच्याकडे न्याय मागतेय. मोदीजी का तुम्ही असा आरोप केला? का तुम्ही राज्याराज्यांमध्ये द्वेष पसरवताय? असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले होते डिलीट, शेवटच्या पोस्टमध्ये लिहीली होती ‘ही’ गोष्ट
शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या पार्थिवावर मारलेल्या फुंकरमुळे आर्यन संतापला; केले असे काही की..
रवीना टंडनने ज्या लहान मुलाला सेटवरून हाकलून लावले तोच आता बॉलिवूडवर करतोय राज्य