Share

आयपीएल सुरू होण्याआधीच राडा! ‘या’ संघात अंतर्गत वाद भडकला; कर्णधारानेच केली…

आयपीएलमध्ये दरवर्षी सर्वोत्कृष्ट क्रिकेटचा सामना पाहायला मिळतो, त्याप्रमाणे अनेक वाद देखील पाहायला मिळतात. आयपीएल 2022 चा हंगाम सुरू होण्यास 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीत या हंगामातील पहिला वाद समोर आला आहे. हा वाद थेट स्पर्धेशी संबंधित नसून राजस्थान रॉयल्सचा अंतर्गत असलेला वाद आहे.

राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया अकाऊंटला गेल्या काही सीझनमध्ये त्याच्या उत्कृष्ट पोस्ट्स आणि फनी स्टाइलमुळे बरीच ओळख मिळाली होती, पण आता या जोकमुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराशीच संबंधित असल्याने याची अधिक चर्चा होत आहे.

राजस्थानच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सैमसनबद्दल काही मीम्स पोस्ट करण्यात आले होते, जे संजू सैमसन ला अजिबात आवडले नाही. त्यावर त्याने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. टीमला त्याने व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला.

https://twitter.com/IamSanjuSamson/status/1507303756341334016?t=sNjaLLGg0NpeHWHsNOPTsg&s=19

इतकेच नाही तर सैमसनने ट्विटरवर राजस्थान रॉयल्सचे अकाऊंट अनफॉलो केले. कर्णधाराची नाराजी उघड झाल्यानंतर हे ट्विट तत्काळ डिलीट करण्यात आले, मात्र फ्रँचायझी व्यवस्थापनाचे खापर सोशल मीडियाच्या टीमवरच पडले. फ्रेंचायझीने संध्याकाळी एक निवेदन जारी केले की, ते त्यांची सोशल मीडिया पद्धत आणि टीम बदलत आहेत.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया टीमवर कोणती कारवाई करण्यात आली किंवा केली जाणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या सोशल मीडियावर संजू सैमसनचे चाहते त्याच्या समर्थनात उतरले असून संघाच्या कर्णधाराचा आदर न करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

सैमसनबद्दल राजस्थानच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जो फोटो व्हायरल करण्यात आला होता, त्यामध्ये एडिटिंग अँपच्या मदतीने संजू सैमसनला महिला बनवले होते. एवढेच नाही तर कॅप्शनमध्ये ‘क्या खूब लगते हो’ असे लिहिले होते. हा फोटो संजू सैमसन बसमध्ये प्रवास करताना गुप्तपणे काढण्यात आलेला आहे.

खेळ

Join WhatsApp

Join Now