इतर मागासवर्गीय आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील 32 जिल्हामधील 106 नगरपंचयती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये 413 जागांसाठी मतदान पार पडले होते. त्याचे निकाल हाती लागताच ठिकठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात जल्लोष पाहिला मिळाला. दरम्यान, याच जल्लोषा दरम्यान साक्री येथे एक दुर्दैवी घटना घडली असून,एका महिलेचा मृत्यू झाला.
धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला असून या निकालात भाजपने बाजी मारत 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला 4 जागा व कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर दोन गटात झालेल्या किरकोळ वाद झाला, मात्र यामध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
घडलेला प्रकार म्हणजे, भाजप कार्यकर्ते जल्लोष करत असताना, तेथून शिवसेनेचे गोटू जगताप हे आपल्या मोटरसायकलने जात होते, त्यावेळी त्यांच्यात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला या वादाचे रूपांतर काही वेळात हाणामारीत झाले.
साक्री नगरपंचायत प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेनेची उमेदवार ताराबाई जगताप यांचा पराभव झाला. याच कारणावरून गोटू जगताप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे सांगितलं जात आहे. यांच्यामधील वाद एवढा वाढला की हाणामारी होऊ लागली. अनेकांनी मध्यस्थी करत मारहाण रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये गोटू जगताप यांनी बहीण मोहिनी जाधव हिने देखील मध्यस्थी केली.
आपल्या भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मोहिनी जाधव वाद सोडवत असताना अचानक खाली कोसळल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना वादात मारहाण झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे. यानंतर, मोहिनी यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहिनी जाधव यांचा मृत्यू भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. घडलेल्या घटनेनंतर नातेवाईकांनी आणि कार्यकर्त्यांनी संबधितांवर गुन्हा दाखल करावा,आणि अटक करावी अशी मागणी केली आहे. मात्र, मोहिनी जाधव यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही
महत्वाच्या बातम्या
विराट कोहलीने कर्णधारपद सोडताच तुफान सेलिब्रेशन करतोय ‘हा’ बाॅलीवूड अभिनेता, प्रतिक्रीया देत म्हणाला…
कर्णधार नसला म्हणून काय झालं? पुन्हा दिसली मैदानात विराटची आक्रमता; पहा मैदानात काय घडलं?
भाजपच्या चित्रा वाघांनी केले रोहित पाटलांचे तोंडभरून कौतुक; म्हणाल्या आज आबा असते तर..