Share

फॉर्च्युनरसोबत रेसिंग, तुफान वेग, गाडीत गाणी लाऊन धिंगाना; वर्धा अपघातापुर्वीचा व्हिडिओ व्हायरल

accident

वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे २५ जानेवारीला झालेल्या अपघातात वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थी नेमके कुठ गेले होते? याविषयी आणखी ही वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.(Racing with Fortuner, hurricane speed, singing songs in the car;)

त्याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. मृत सात विद्यार्थ्यांपैकी एक असलेला पवन शक्ती या विद्यार्थ्यांचा सोमवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थी बाहेर गेले होते. नागपूर तुळजापूर महामार्गावरील इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये ते गेले होते.

त्या हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये हे साफ दिसत आहे. अपघातापुर्वीचाही एक व्हिडीओ सूत्रांच्या हाती लागला आहे. त्या सात जणांपैकी मृत मुलगा शुभम जयस्वाल, याच्या इंस्टाग्राम अकाउंटला हा व्हिडिओ सापडला आहे.

या व्हिडिओमधून असे दिसून येत आहे, कि मुले गाडीमध्ये गाणी लावून आनंद व्यक्त करत आहेत. व्हिडिओत दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर सोबत त्यांनी रेसिंग लावल्याची चर्चा सुरु आहे. तर, एक मुलगा सावकाश असे म्हणत आहे.

यावरून गाडीचा वेग किती असेल, याबद्दल देखील वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. सेलसुरा प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अपघाताच्या काही वेळ पूर्वीचाच आहे. देवळी तालुक्यातील इसापूर येथील एका हॉटेल मधून जेवण करून परत येतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अपघात झाल्याच्या सातव्या दिवशी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ शूट करताना ड्रायवरच्या बाजूच्या सीटवर बसून शूट केल्याचं बोललं जातं आहे. व्हिडीओत गाडीचा वेग अतिशय असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

व्हिडीओत काही विद्यार्थी हे पुढं जाणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनरसंबंधी वक्तव्य करत असल्यानं काळ्या फॉर्च्युनर रेसिंग लावल्याची चर्चा सुरु आहे. गाडीत आराम से असा व्हिडीओत शब्द प्रयोग असल्यानं देखील गाडीचा वेग जादा असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या
तरुणाने आपल्याच बहिणीशी केला साखरपूडा; प्रीवेडिंगनंतर समोर आलं भयानक सत्य
भयंकर अपघात! इलेक्ट्रिक बसने दिली १७ वाहनांना जोरदार धडक, ६ जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now