बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचा (R. Madhavan) मुलगा वेदांत माधवनने मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन केले होते. कोपेनहेगनमध्ये पार पडलेल्या डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेच्या दोन वेगवेगळ्या गटात त्याने रौप्य आणि सुवर्ण पदक जिंकत भारताला गौरव मिळवून दिले होते. वेदांतच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता.
पुरुषांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईल या स्पर्धेत वेदांतने रौप्य पदक मिळवले होते. त्यानंतर ८०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली होती. त्याच्या या कामगिरीबाबत त्याचे वडील आणि अभिनेता आर. माधवनने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.
माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर वेदांतच्या सन्मान सोहळ्यादरम्यानचे व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर आर. माधवन आणि त्याच्या मुलावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वेदांतने त्याच्या या यशानंतर एका राष्ट्रीय स्तरावरील वाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना वेदांतने त्याच्या या विजयाचे श्रेय त्याच्या आई-वडिलांना दिले होते.
दूरदर्शन इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वेदांत म्हणाला की, ‘मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी खूप मेहनत घेतली आहे. परंतु, मी सुरुवातीपासून माझ्या वडिलांच्या छायेत राहू इच्छित नव्हतो. मला माझे स्वतःचे नाव कमवायचे होते. मला केवळ आर. माधवनचा मुलगा म्हणून राहायचे नव्हते. तर मला माझी एक वेगळी ओळख निर्माण करायची होती’.
पुढे वेदांतने त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल सांगताना म्हटले की, ‘माझे आई-वडील नेहमीच माझी काळजी घेतात. त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली आहे. तसेच त्यांनी माझ्यासाठी अनेक त्यागसुद्धा केले आहेत. यामधीलच एक म्हणजे ते माझ्यासाठी आपला देश सोडून दुबईलासुद्धा शिफ्ट झाले’.
दरम्यान, कोरोनामुळे मागील वर्षी मुंबईत अनेक मोठमोठे स्विमिंग पूल बंद करण्यात आले होते. त्यामुळे आर माधवनला सराव करण्यासाठी अडचणी येत होत्या. तर मुलाची ही परिस्थिती पाहता आर माधवनने पत्नी आणि मुलासह दुबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून वेदांत योग्यप्रकारे तयारी करू शकेल. त्याच्या या निर्णयामुळेच वेदांत चांगल्या पद्धतीने सराव करू शकला आणि आज त्याच्या या कष्टाचे फळ सर्वांना पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
वयाच्या 20 व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री स्वतःहून बनली मोठ्या स्टार्सची आई, 250 हुन अधिक चित्रपटात केले काम
अक्षया देवधरच्या साखरपुड्याच्या पोस्टवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केली कमेंट, म्हणाला…
PHOTO: टीव्हीची सुसंस्कृत सून रश्मी देसाईने पारदर्शक गाऊनमध्ये केले बोल्ड फोटोशूट, सगळं दिसलं आरपार