Share

आर माधवनच्या मुलाचं होतंय कौतुक, विदेशात उंचावली भारताची मान; केली ‘ही’ कौतुकास्पद कामगिरी

R Madhavan

बॉलिवूड अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यासोबतच तो त्याचा मुलगा वेदांतमुळेही माध्यमात चर्चेत येत असतो. माधवनचा मुलगा वेदांत हा उत्कृष्ट जलतरणपटू (Swimmer) असून त्याने आतापर्यंत अनेक पदक आपल्या नावे केले आहेत. तर आताही वेदांतने उत्कृष्ट कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे.

वेदांतने शुक्रवारी डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. पुरुषांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत त्याने हे पदक मिळवले आहे. यांसदर्भात स्वतः माधवनने सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

माधवनने ट्विटरवर स्विमिंग फेडरेशने ऑफ इंडियाची पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि देवाच्या कृपेने साजन प्रकाश आणि वेदांत माधवनने कोपेनहेगनमध्ये झालेल्या द डॅनिश ओपन स्पर्धेत भारतासाठी क्रमशः सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले आहे. कोच प्रदीप सर, SFI आणि ANSA तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला खूप अभिमान वाटत आहे.

https://twitter.com/ActorMadhavan/status/1515201014718160896?s=20&t=JWk_qOc3mq3ueUNVzAFGiA

रौप्य पदकासाठी वेदांतच्या नावाची घोषणा झाल्यानंतर माधवनने इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ क्लीप शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘वेदातंने कोपेनहेगनमध्ये आजोयित डॅनिश ओपनमध्ये भारतासठी रौप्य पदक मिळवले’. माधवनच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत त्याला आणि वेदांतला शुभेच्छा देत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत.

माधवनने १९९९ साली सरिता माधवनसोबत लग्न केले होते. लग्नाच्या ६ वर्षानंतर २००५ साली त्यांचा मुलगा वेदांतचा जन्म झाला. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशीपमध्ये महाराष्ट्रासाठी वेदांतने सात पदक जिंकले होते. यामध्ये चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश होता. बंगळुरूमधील बसवगुंडी अॅक्वाटिक सेंटरमध्ये आयोजित स्विमिंग चॅम्पियनशीप या स्पर्धेत त्याने हे ७ पदक जिंकले होते.

महत्त्वाच्या बातम्या :
लहाणपणी उपाशी झोपायचा, बहिणीच्या मृत्युनंतर झाला होता शांत, विजयची कहाणी वाचून व्हाल भावूक
विराट कोहलीचा सुपरमॅन कॅच पाहून अनुष्का शर्माने दिली ‘अशी’ रिऍक्शन, व्हिडीओ व्हायरल
कपूर कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे; करिना कपूर पुन्हा करणार लग्न? व्हायरल फोटोनंतर चर्चांना उधाण

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now