‘मनसेच्या खांद्यावर बंदुका ठेवून भाजपाने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला,’ अशा जहरी शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या आंदोलनाचा आज सर्वाधिक फटका हिंदूंना बसला असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केला आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘मनसेच्या खांद्यावर बंदुका ठेवून भाजपाने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला. तसेच,हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. ” असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेवर टीका केली.
भाजपला लक्ष करताना राऊत म्हणाले, ‘भाजपाला ज्या गोष्टी जमत नाहीत. त्या गोष्टी लहान पक्षांना हाताशी घेऊन केल्या जात आहे. भाजपाने आज राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी करुन घेतला आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. तसेच हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव आखला जात असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला.
तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘ज्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे त्याविरुद्ध आता हिंदुंमध्या जागृती होतेय, आणि हिंदुच रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटणार नाही, पण हिंदुंनी संयम राखावा असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. भोंग्याचा नियम पाळायचा असेल तर सर्व धर्मियांसाठी आहे. याचा जास्त फटका हा हिंदु धर्मियांना बसला असल्याच राऊत म्हणाले.
पुढे राऊत म्हणतात “आंदोलनाचा सर्वात जास्त अनुभव या देशात फक्त शिवसेनेला आहे. आंदोलनं कशा प्रकारे करावीत हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजे.” “मनसेचं आंदोलन कुठे दिसलच नाही. कारण राज्यात भोंग्यांवरुन आंदोलन करण्याची स्थिती नाही. त्यामुळे जो विषयच अस्तित्वात नाही अशा विषयांवर कसं आंदोलन करताय?”, असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, याबाबत राऊत यांनी ट्विट देखील केलं आहे. ट्विटमध्ये ते राऊत म्हणतात, ‘भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुध्दा गळा घोटला..शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर सह अनेक तीर्थस्थानावरील भोंगे बंद झाल्या मुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांन वर्ष भोंग्या द्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते.’
महत्त्वाच्या बातम्या
हार्दिक पांड्याचा ओवर-कॉन्फिडेंट गुजरातला घेऊन] बुडाला\! सामन्यापूर्वी मयंकची छेडछाड झाली, पराभवाने त्याचा अभिमान चकनाचूर झाला.
मागील जन्मात मी झाशीची राणी आणि तात्या टोपेंसोबत लढत असेल; फडणवीसांचे मोठे वक्तव्य
मला आई-वडिलांच्या छायेत राहायचं नव्हतं पण.., आर माधवनच्या मुलाच्या वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया
अक्षया देवधरच्या साखरपुड्याच्या पोस्टवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केली कमेंट, म्हणाला…