अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांची प्रमुख भूमिका असलेला पुष्पा चित्रपट देशात धुमाकूळ घालत आहे. विविध अभिनेते, क्रिकेटपटूंसह राजकारण्यांवरही पुष्पा चित्रपटाचा प्रभाव पडला आहे. अनेकजण पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणताना दिसत आहेत.(‘Pushpa’ Fever rises on Beed MLA, I don’t say bow down)
त्याचसोबत राजकारणीसुद्धा पुष्पा चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. आता बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हेदेखील पुष्पा चित्रपटाच्या प्रेमात आहेत. बीडमध्ये एका सभेला संबोधित करताना संदीप क्षीरसागर यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग बोलले आहेत.
यावेळी संदीप क्षीरसागर हे आगामी निवडणुकीबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी पुष्पा स्टाईलमध्ये ‘मैं झुकेगा नही…’ असे म्हणाले. संदीप क्षीरसागर हे म्हणताच समोर बसलेल्या जमावात मोठा जल्लोष निर्माण झाला. त्याचसोबत ते म्हणाले की, निवडणुकीत सर्वजण एकत्र लढणार आहेत. माझ्या पाठीशी तरुणवर्ग आहे.
पुढे ते म्हणाले की, माझ्या पाठीशी आई-बहीणीचा आशीर्वाद आहे.
याचदरम्यान, संदीप क्षीरसागर यांच्या आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील भाजपला टोला लगावताना ‘झुकेंगे नही’, असं म्हटलं होतं. यावरूनच पुष्पा चित्रपटाची क्रेझ राजकारण्यांमध्येही असल्याचे दिसून येत आहे.
संदीप क्षीरसागर हे राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत गेले.
त्यानंतर राष्ट्रवादीने जयदत्त क्षीरसागर यांच्या पुतण्याला म्हणजेच संदीप क्षीरसागर यांना बीडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत पुतण्याने काकाचा अवघ्या १९८४ मतांनी धक्कादायक पराभव केला होता.
महत्वाच्या बातम्या
‘या’ महिलेने इंग्रजांना नाकी नऊ आणले होते, पुरूषांच्या वेशात क्रांतीकारकांना करायची ‘ही’ मदत
जावयाने दारूच्या नशेत सासरी घातला राडा, मेव्हण्याच्या खोलीत शिरला अन् केले ‘हे’ लाजिरवाणे कृत्य