Share

शिवसेनेला धक्का! उद्धव ठाकरेंच्या सर्वात जवळचा आमदार शिंदेंच्या गोटात; रात्रीतून सुरतला पलायन

शिवसेनेचे जेष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३५ आमदारांसोबत पक्षाविरोधात बंड करत मोठं पाऊल उचललं आहे. तब्बल ३५ आमदारांसह एकनाथ शिंदे सुरतमध्ये आहेत. त्यांना आता शिवसेनेतूनच पाठिंबा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे आता मातोश्रीच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या आमदार यामिनी यशवंत जाधव आणि आमदार गीता जैन या देखील दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. काल दुपारी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत यामिनी जाधव या आजारपणाचे कारण देवून गैरहजर राहिल्या होत्या.

त्याच आता शिवसेनेच्या बंडात सामिल झाल्याची माहिती मिळत आहे. तर गीता जैन या शिवसेनेच्या समर्थक अपक्ष आमदार आहेत, त्यादेखील शिंदे यांच्याकडे सुरत येथे दाखल झाल्या आहेत. माहितीनुसार, यामिनी जाधव यांच्या पतीमागे सध्या ईडी लागली आहे, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आहे.

यामिनी जाधव यांचे पती मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव आहेत. यांच्यामागे सध्या ईडीचा समेमिरा लागला आहे. याआधी त्यांची ईडी आणि आयकर विभागाकडून अनेकदा कसून चौकशी झाली आहे. त्यांच्यावर अटकेचीही टांगती तलवार आहे.

यशवंत जाधव हे मागील अनेक वर्षांपासून महत्वाच्या पदावर असून ते ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे नेते समजले जातात. त्यामुळे यामिनी जाधव यांच्या बंडातील सहभाग हा मातोश्रीला मोठा धक्का मानला जातो. ईडीच्या भीतीने त्या शिंदे यांच्या बंडात सहभागी झाल्या अशा सध्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार लता सोनावणे या देखील सुरतमध्येच असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती, त्या बैठकीला केवळ १८ आमदार उपस्थित होते, अशी माहिती आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now