अभिनेता ते शेतकरी कार्यकर्ता दीप सिद्धूचा (deep sidhu) अपघातात मृत्यू झाला आहे. एका वृत्तानुसार ही घटना हरियाणातील सोनीपतमध्ये मंगळवारी 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घडली. अपघात झाला त्यावेळी दीप सिद्धू मित्रासोबत दिल्लीहून पंजाबला परतत होता. तो स्वतः गाडी चालवत होता. त्याचवेळी पिपली टोल प्लाझाजवळ त्यांची स्कॉर्पिओ ट्रकला धडकली. (punjabi actor deep sidhu died in road accident )
या अपघातात महिला बचावली, मात्र दीप सिद्धूचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, दीप सिद्धूचा त्याआधीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह जवळच्या खरखोडा रुग्णालयात नेण्यात आला आहे. दीपच्या मित्राला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी दीप सिद्धूच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “सुप्रसिद्ध अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता दीप सिद्धूच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.
कोण होता दीप सिद्धू?
दीप सिद्धू हा पंजाबचा प्रसिद्ध अभिनेता होता. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान दीप सिद्धूचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात त्याने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना याला ‘क्रांती’ म्हटले होते. त्यानंतर दीप सिद्धूवर गंभीर आरोप झाले.
गेल्या वर्षी २६ जानेवारीला दिल्लीत शेतकरी आंदोलनाचे समर्थक आणि पोलिस यांच्यात झालेल्या हिंसाचाराला जबाबदार धरण्यात आलेल्यांमध्ये दीप सिद्धूच्या नावाचाही समावेश होता. लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावणे आणि तेथील हिंसाचारात दीप सिद्धूचा हात असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात 9 फेब्रुवारी 2021 रोजी त्याला हरियाणातील कर्नाल येथून अटक करण्यात आली होती.
नंतर एप्रिल 2021 मध्ये न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दीप सिद्धूचा पहिला चित्रपट ‘रमता जोगी’ 2015 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर 2018 मध्ये आलेल्या ‘जोरा दस नंबरीया’ने दीपची तरुणांमध्ये ओळख निर्माण केली. राजकीय क्षेत्रातही तो सक्रिय होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दीप सिद्धू भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सनी देओलसोबत प्रचार करताना दिसला होता.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! १३ वर्षाच्या मुलीवर १६ जणांनी केला बलात्कार; भयानक घटनाक्रम ऐकून पोलिसही हादरले
VIDEO: तीन दिवसांपासून रस्त्यावर पोलिस दिसले नाही म्हणून दारुड्याने केला पोलिसांना फोन; म्हणाला…
आज फिर एक बिल्ली ने.., राऊतांच्या ग्रँड प्रेस कॉन्फरन्सवर अमृता फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
राहुल बजाज: कधीही न डगमगणारे नेतृत्व, सरकारसमोरही ज्यांचा आवाज होता बुलंद, वाचा त्यांच्याबद्दल..