Share

Bank : पुणेकरांनो… आजच पैसे काढून घ्या; उद्यापासून पुण्यातील ही बँक बंद होणार

bank

Bank : पुण्यात विस्तारलेली ‘रुपी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’ ही बँक लवकरच बंद होणार आहे. आरबीआयने ही मोठी कारवाई केल्याचे समोर येते. ज्या ग्राहकांचे या बँकेमध्ये खाते आहे. त्यांनी लवकरात लवकर आपली रक्कम बँकेतून काढावी, असे आवाहन आरबीआयकडून करण्यात आले आहे. या कारवाईमुळे एका मोठ्या सहकारी बँकेला टाळं लागणार आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आरबीआयचा निर्देशांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई केली जात आहे. बँकेकडे काहीच भांडवल शिल्लक नाही. तसेच उत्पन्नाचे कोणतेच साधन सुद्धा बँकेकडे नाही. त्यामुळे आरबीआयने बँकेला टाळे ठोकले आहे.

आरबीआयने १० ऑगस्ट रोजी रुपी बँक पुढील ६ आठवड्यांनंतर बंद होणार असल्याचे पत्रक आधीच जाहीर केले होते. त्यानुसार २२ सप्टेंबर २०२२ रोजी रुपी बँक बंद केली जाणार आहे. त्यानंतर ग्राहकांना कोणतेच व्यवहार या बँकेतून करता येणार नाहीत.

अवघा एक दिवस आता पुणेकरांचा हातात आहे. ज्यातून ते बँकेत असलेली आपली ठेव काढून घेऊ शकतात. त्यानंतर मात्र रुपी बँक व तिच्या इतर शाखांना टाळा लागणार आहे. त्यामुळे जर काही व्यवहार राहिले असतील तर त्यासाठी आरबीआयच्या व सरकारच्या पुढील निर्देशांवर, मदतीवर ग्राहकांना अवलंबून राहावे लागेल.

बँक बंद झाल्यानंतर सुद्धा ज्या ग्राहकांच्या ठेवी बँकेत अडकून पडल्या असतील त्यांना केवळ ५ लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येऊ शकतात. DICGC द्वारे ग्राहकांच्या ठेवींना संरक्षण दिले जाते. DICGC ही रिझर्व बँकेची उपकंपनी आहे. ती कंपनी सर्व सहकारी बँकांच्या ग्राहकांना ठेवींवर विमा संरक्षण देते. त्यामुळे रुपी बँकेतील ग्राहकांना सुद्धा ५ लाखांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते.

आरबीआयच्या नियमांचे पालन न करणाऱ्या, वारेमाफ कर्ज वाटप करणाऱ्या बँकांवर मागील काही काळात आरबीआयने कडक निर्बंध लादले. त्यातून पण मार्ग न निघाल्यास त्या बँकांचे लायसन्स रद्द केले आहे. रुपी बँकेबाबतीत सुद्धा हेच होत आहे. ग्राहकांनी मात्र वेळेतच आपल्या ठेवी काढून घेणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे
Narayan Rane : अधीश बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार ; नारायण राणेंना कोर्टाचा दणका
raju srivastav : राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड! वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या बातम्या आर्थिक

Join WhatsApp

Join Now