कट्टर पुणेकरांचा स्वभाव आता कोणाला जगजाहीर करण्याची गरज नाही. कोणी खोडी केली तर गोड भाषेत खोचक उत्तर देणे, आणि व्यक्तीची फिरकी घेणे यात पुणेकर माहीर आहेत. हेच पुणेकर असण्याचे गुण क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्यामध्ये देखील आहेत.
ऋतुराज गायकवाडचे पुणेरी गुण सामना संपल्यानंतर सर्वांनाच पाहायला मिळाले. सामना संपल्यानंतर मुलाखत देताना भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा ऋतुराजची खोडी काढत होता. यावेळी, ऋतुराजने जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांना तो पुणेकर असल्याची आणखी एकदा आठवण झाली.
ऋतुराजच्या उत्तराने चहलची बोलतीच बंद झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पुणेकरांनी तर प्रचंड प्रतिसाद दिला आहे. तर दोघांमध्ये नेमकं झालं काय याबद्दल आम्ही तुम्हांला सांगतो.
आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यात ऋतुराजने पहिले अर्धशतक झळकावले. सामन्यात एका षटकात तब्बल पाच चौकार त्याने लगावले. या सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही मोठी भूमिका बजावली. कारण चहलने या सामन्यात महत्वाच्या तीन विकेट्स मिळवल्या आणि त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
या सामन्यानंतर चहलने ऋतुराजची खास मुलाखत घेतली. या सामन्यात एक चौकार मारताना ऋतुराज हा जमिनीवर पडला होता. त्यावर चहलने ऋतुराजला खोचक प्रश्न केला की, एक चौकार तू असा लगावलास की, त्यामध्ये तू बॅटचाही वापर केलास, हेल्मेटचाही वापर केलास आणि जमिनीवरही पडलास. या सामन्यात तु पाच चौकार लगावले तेव्हा सहाव्या चेंडूच्या वेळी मनात काय भावना होत्या?
https://twitter.com/BCCI/status/1536928580579762176?t=QL66KzvZ-ui6kv0t5T2fpg&s=19
त्यावर, ऋतुराजने युजवेंद्र चहलला चोख उत्तर दिलं. ऋतुराज म्हणाला, संघातील प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ हे चांगली मेहनत घेतात, हे त्याचेच फळ आहे जे मला मिळाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्यासारख्या व्यक्ती जिममध्ये जात असतात, त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्ही देखील जिमला जातो.