pune women angry workers who want close to shop | छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्ये केले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. अशात पुणे बंदची हाक देण्यात आली होती. आज वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुक मोर्चा काढण्यात आला होता.
पुण्यातील डेक्कन परिसरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात करण्यात आली होती. या मोर्चामध्ये राज्यातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा या मोर्चामध्ये भाग घेतला होता.
या मुक मोर्चामुळे बाजारपेठा बंद होत्या. या मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. पण अशात एक वेगळी घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील एका महिलेने मी दुकान बंद करणार नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांना परत पाठवले आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
पुण्यातल्या वाघिणीने वडापाव शेणक्यांना बरोबर बाहेरचा रस्ता दाखवला. कसला बंद? कशासाठी बंद? दुकान बंद करणार नाही जा काय करायचं ते करा💪🏼
दादागिरीचा बंद फसला वाटतं😅#बंद_म्हणे #पुणे pic.twitter.com/MZjefDcTBX— Amruta 🇮🇳 (@SjAmruta) December 13, 2022
काही संघटनांचे कार्यकर्ते महिलेला आज मुक मोर्चा आहे, त्यामुळे दुकान बंद करा असे सांगताना दिसून येतात. पण त्या महिलेने ठामपणे त्या मोर्चाला विरोध केला आहे. ते दुकान पुण्यातील एफसी रोडवर आहे. मोर्चा सुरु असताना ते दुकान उघडेच होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी दुकान का उघडे आहे? अशी विचारणा केली.
त्यावेळी आपल्याला दुकान बंद करायचे नसल्याचे महिलेने म्हटले. अशात काही कार्यकर्ते वादही घालत होते. पण त्या महिलेने कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. महाराजांनी आपल्याला काय शिकवले आपण काय करतोय? महाराजांचा एकतरी गुण घ्या, असे ती महिला कार्यकर्त्यांना बोलताना दिसून येते.
आम्हाला महाराजांचे विचार माहिती आहे. आम्हाला महाराजांबद्दल काय वाटते हे आम्हाला माहिती आहे. आम्ही दुकान बंद करणार नाही. तुम्ही महाराजांचे विचार घ्या, असे ती महिला कार्यकर्त्यांना म्हणताना दिसून येते. महिलेने कार्यकर्त्यांची केलेली कानउघडणी नेटकऱ्यांनीही खुप भावली आहे.
महत्वाच्या बातम्या-
samruddhi mahamarg : आधी अपघात झाला आता ट्रक अडकला, बाहेर काढण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली खोदला खड्डा
samruddhi mahamarg : मोदींनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले त्याच ठिकाणी पहील्याच दिवशी झाला भीषण अपघात
पैशांचा पाऊस! १ रूपयांच्या स्टाॅकने दिला बंपर परतावा; एका झटक्यात बदलले नशीब