पुण्यातील धनकवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. छोट्याशा कारणावरून एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राला पेट्रोल टाकून पेटवून दिले आहे. या दुर्घटनेत २८ वर्षाचा सुरज मरळ हा गंभीररीत्या भाजून जखमी झाला आहे.(Pune trembled! In the cremation ground)
धनकवाडीच्या स्मशानभूमीत ही घटना घडली आहे. सुरज मरळ हा घरून रेडीमेड कपडे विकण्याचा व्यवसाय करतो. ७ तारखेला मध्यरात्री सुरज हा आपल्या मित्राकडे म्हणजेच सत्येंद्र प्रमोद कुमार यादव उर्फ गोविंदा याच्या सोबत दारू पिण्यासाठी गेला होता.
दारू पिऊन झाल्यानंतर सुरज आणि गोविंदा धनकवाडी जवळील स्मशान भूमीत आले. तेव्हा ते चर्चा करत होते. बोलत असतानाच दोघांमध्ये अचानक वाद सुरु झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, गोविंदाने सुरज मरळच्या डोक्यात आधी सिमेंटचा ब्लॉक घातला.
त्यानंतर त्याने बाटलीत आणलेलं पेट्रोल सूरजच्या अंगावर टाकून त्याला पेटवून दिलं. या घटनेत सुरज मरळ हा जवळपास तीस टक्के भाजला असून, त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
घटनेचं गांभीर्य पाहून सहकारनगर पोलिसांनी सत्येंद्र प्रमोद कुमार यादव विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
आधी माझा हात दाबला अन् नंतर…; मिस बमबमने सांगितला पुतीन यांच्यासोबतचा ‘तो’ भयानक किस्सा
फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमध्ये उल्लेख केलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयाला टाळं