Share

लाल महालातील लावणीचा वाद! अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक; गौमूत्राने केले शुद्धीकरण

lal mahal

शुक्रवारी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. लाल महालामध्ये एका तमाशाच्या गाण्यावर चित्रीकरण झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना दिसत आहे. लाल महाल मध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.

यामुळे नृत्यांगना वैष्णवी पाटील ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या आठवणींचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या लाल महालामध्ये अशा गाण्यांचं चित्रीकरण होणं हा लाल महालाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे.

व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. यानंतर कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता या प्रकरणी अखिल भारतीय मराठा महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुण्यातील लाल महालात लावणी केली म्हणून लाल महाल अपवित्र झाल्याच्या निषेधार्थ लाल महालाचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. सोबतच जिजाऊच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक देखील करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लावणी करण्यात आली, ती जागा गौमूत्राने स्वच्छ करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे वैष्णवी पाटील हिने या प्रकरणी जाहीर महाराष्ट्राची माफी मागितली आहे. वैष्णवीने म्हंटलं आहे की, ‘लाल महालात लावणीचा व्हिडीओ करत असताना माझ्या मनीध्यानीही काहीच आलं नव्हतं की यातून काही वाद निर्माण होईल. भावना दुखावल्या जातील हे मनातही आलं नव्हतं. मात्र ही चूक माझ्याकडून झाली हे मला कळलं. त्याक्षणी मी तो व्हीडिओ डिलिट केला. मी सर्वांना आज सांगते आहे की तो व्हीडिओ डिलिट करा,’ असं आवाहन तिने केले आहे.

वैष्णवीने इंस्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह येत माफी मागितली आहे. तसेच पुढे तिने म्हंटलं आहे की, ‘जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असा माझा काहीही हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून ही चूक झाली त्याबद्दल मी माफी मागते,’ असं म्हणत तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
…म्हणून आम्ही शरद पवारांची भेट नाकारली; ब्राम्हण महासंघाने स्पष्टच सांगितले
लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने गदारोळ; अखेर वैष्णवी पाटीलने मागितली महाराष्ट्राची माफी
नवाब मलिकांचे दाऊद गॅंगशी संबंध, त्यांनी दाऊद टोळीची मदत घेतल्याचे पुरावे; कोर्टाने स्पष्टच सांगितले
“काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?” आता शिवसेनेलाही लागली चिंता

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now