pune satara road accident | गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते अपघाताची प्रकरणे खुप वाढली आहे. आता पुणे-सातारा महामार्गावर एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संबंधित अपघात हा कापूरहोळ या गावाच्या हद्दीत घडला आहे. या अपघातामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एक व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन कारमधून जात होता. पण यावेळी रस्त्यात खड्डे चुकवण्याच्या नादात त्यांनी गाडी बाजूला घेतली. तसेच दुसरी गाडी समोरून येत होती. त्यामुळे त्यांनी ती गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्यांचे कारवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार डिव्हायडरला धडकली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहे, तर कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
वसीम इब्राहिम असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव होते. या अपघातावेळी त्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. वडील शुद्धीवर येत नसल्याने त्याने आपल्या आईला फोन लावला आणि म्हणाला की, अब्बा उठो ना मम्मी से बात करो ना. त्याचे हे शब्द डोळे पाणावणारे होते.
त्याचे वडील मात्र शुद्धीत नव्हते. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालायात नेले जात होते. त्यावेळीही त्यांचा मुलगा हुजेफा हा देवाकडे वडीलांना नीट करा अशी प्रार्थना करत होता. पण या अपघातात वसीम यांना गंभीर मार लागलेला होता. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
यावेळी वसीम यांच्याशिवाय त्यांचा मुलगा हुजेफा (१५), जावेद आदिलशाह इनामदार (३६), शैरोनिसा जावेद इनामदार, शाहरुख शरीफ मुजावर (३०) असे त्या कारमध्ये बसलेल्यांची नावे आहेत. या अपघातात वसीम यांचा मृत्यू झाला आहे. तर इतरजण जखमी झाले आहे.
हा अपघात खुप भयानक होता. यामध्ये कार पुढून पुर्णपणे फुटली आहे. यावेळी एका लहान मुलाने आपल्या डोळ्यासमोर वडिलांचे निधन होताना बघितले. त्यांनी दुसऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादात आपली गाडी वळवली. पण त्यात त्यांचाच मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Chandrakant Patil : अजित पवार अन् मुख्यमंत्री…; चंद्रकांत पाटलांनी उडवली रोहित पवारांची खिल्ली
प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला हिरोईनसोबत रोमान्स करताना रंगेहात पकडले, त्याने बायकोवर गाडी घालून चिरडले
Pakistan : बॅगा भरा अन् कराचीला निघा; झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ झाला तुफान ट्रोल