पुणे| गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील महामेट्रोचे काम चालू होते. पुणेकरांचा वेळ आणि पैसा दोन्ही या महामेट्रोच्या येण्याने वाचणार होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकर महामेट्रोच्या आगमनाची वाट बघत होते. आणि तो दिवस शेवटी आलाच. ६ मार्च २०२२ रोजी पुण्यातील महामेट्रोची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामेट्रोचे उदघाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या महामेट्रोचा आनंद घेतला. पुण्यातील महामेट्रो हि सर्व स्तरातून चालू झाली नसून, सध्या मेट्रो हि दोन मार्गांवरून धावत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ च्या सुमारास मेट्रो सुरु करण्यात आली होती. तसेच, पिंपरी चिंचवड मध्ये पिंपरी ते फुगेवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो धावतांना दिसत आहे. पहिल्या दिवशी पुणेकरांनी या महामेट्रोचा भरपूर आनंद घेतला. मात्र त्यांनंतर मेट्रोच्या चुकीच्या कामगिरीने पुणेकरांची डोकेदुखी वाढली आहे. मेट्रो मार्गावर असलेल्या एका स्थानकामुळे प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ‘भोसरी’ असे या स्थानकाचे नाव सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
तो कसा तर, पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट यामार्गादरम्यान असलेल्या स्थानकाचे नाव गोंधळात टाकणारे आहे. तसेच ते रहिवासी भागापासून दूर असल्याने लोकांना पायी जावे लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. भोसरी स्थानकामुळे प्रवाशांमध्ये विशेषत: गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण, पुणे-मुंबई महामार्गालगत नाशिक फाटा येथे हे स्थानक असताना त्याला ‘भोसरी स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. भोसरी हे नाशिक फाट्यापासून किमान ५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे.
इंडियन एक्सप्रेच्या वृत्तानुसार, भोसरी येथील रहिवासी असलेल्या सचिन रंगदळ यांनी गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड येथे मेट्रो ट्रेनमध्ये चढलेल्या आपल्या नातेवाइकांचा किस्सा सांगितला, त्यांना प्रवास करतांना किती त्रास सहन करावा लागला हे त्यांनी सांगितले. सचिन रंगदळ म्हणाले, आमचे नातेवाईक पिंपरी येथे मेट्रो ट्रेनमध्ये चढले. मेट्रो ट्रेन भोसरीला जाते, असे त्यांना सांगण्यात आले. एका स्टेशन नंतर, ते स्टेशनवर उतरले कारण सहप्रवाशांनी त्यांना भोसरी स्टेशन आल्याचे सांगितले.
मात्र, त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना असे आढळून आले की ते खाली उतरलेल्या स्टेशनचा भोसरीच्या उपनगराशी काहीही संबंध नाही. खरतर तो नाशिक फाटा परिसर होता. त्यानंतर त्यांना रिक्षाने नाशिक फाटा परिसरातून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भोसरीला जावे लागले. पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी त्यांना १५० रुपये जास्तीचे मोजावे लागले. त्याआधी त्यांना मेट्रोच्या तिकिटासाठीसुद्धा खूप हेलपाटे मारावे लागले. मेट्रो स्टेशनच्या या चुकीच्या नामकरणामुळे त्यांचा बराच वेळ आणि पैसा वाया गेला.
भोसरीच नाही तर इतर मेट्रो स्थानकांच्या जागेवरही कासारवाडीतील रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे, पतित पावन संघटनेचे राजेश मोटे यांनी भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी स्थानकांची नावे देण्याबाबत भविष्यात काळजी घ्यावी. असा सल्ला देखील दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना ‘या’ गायकासोबत रिलेशनशिपमध्ये; स्वत:च केले उघड
‘काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय ही तर भाजपाची चूक’, हिंदू महासंघाने भाजपला सुनावले
“शेतकऱ्यांवा दिवसा वीज न दिल्यास जनआंदोलन उभे करून ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावणार”
महागाई वाढली असताना गरिबांनी जगायचं कसं? केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे भडकल्या..