Share

pune : जिथे भाईगिरी केली तिथेच पोलिसांनी काढली धिंड, पुण्यातील तरुणांचा व्हिडिओ पुन्हा आला समोर

pune police

pune police share two guys video  | पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी कोयता गँगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये काही गुंड हातात कोयता घेऊन दहशत पसरवत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चांगलाच चोप दिला होता.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ते तरुण कोयता घेऊन फिरत होते. ते वस्तुंची, गाड्यांची तोडफोड करत होते. त्यांना असं पाहून तिथले नागरिक खुपच घाबरले होते. पण त्याठिकाणी लगेचच दोन पोलिस आले आणि त्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला.

त्यामध्ये एका तरुणाची तर भररस्त्यात धुलाई करण्यात आली होती. तर एक तरुण पळून गेला होता. आता फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. त्यामध्ये करण अर्जून दळवी या २० वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना करण हा बीड येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांच्या एका पथकाने त्याला बीडमध्ये जाऊन अटक केली आहे. पुण्यात आणल्यानंतर ज्या ठिकाणाहून तो पळाला होता. तिथेच त्याला पोलिसांनी आणले आणि त्याची धिंड काढली आहे.

https://twitter.com/ShyamasundarPal/status/1609962618974015490

पोलिसांनी त्याचे हात पाठीमागे बांधले होते. त्या संपुर्ण परिसरात त्याची धिंड काढण्यात आली आहे. जे नागरिक त्यादिवशी त्याला बघून पळत होते. तेच नागरिक आता त्याला पाहून हसत होते. त्यामुळे आरोपी आता असं काही करण्यापूर्वी चारदा विचार करेल.

तीन दिवसांपूर्वी सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. ते गेल्या काही दिवसांपासून या भागात कोयता घेऊन सऱ्हासपणे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेचा व्हिडिओही समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

महत्वाच्या बातम्या-
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षकच आहेत; इतिहासकारांनी दिले ऐतिहासीक पुरावे
Uddhav thackeray : ठाकरेंना सोडलं तो आयुष्यातील सर्वात दु:खाचा क्षण; शिंदे गटातील बड्या मंत्र्याचे वक्तव्य
‘उर्फी जावेदचे थोबाड फोडणार, हा नंगानाच महाराष्ट्रात खपवून घेणार नाही’; चित्रा वाघ कडाडल्या

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now