Share

महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण, वाचा संपूर्ण प्रकरण

crime

पुणे जिल्ह्यात दररोज धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस येत आहे. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात घडल्याचे उघडकीस आला आहे. महिलेला मधलं बोट दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये.

तर जाणून घेऊया नक्की प्रकरण काय? कोणत्या कारणावरून तरुणाला मारहाण करण्यात आली? ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील आहे. महिला वारंवार हॉर्न वाजवत असल्यामुळे तरुणाने तिला मिडल फिंगर दाखवल्याने या तरुण इंजिनिअरला मारहाण करण्यात आली आहे.

तसेच तरुणाला मारहाण करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीत तरुणाच्या डोक्यात बारा टाके पडले. मात्र या प्रकरणात अद्याप सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

दरम्यान, महिला वारंवार हॉर्न वाजवत असल्यामुळे तरुणाने तिला मिडल फिंगर दाखवल्याचा दावा केला जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडल्याचे उघडकीस आले होते. वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवल्याच्या आरोपातून कोर्टाने आरोपीला तीन वर्षांचा कारावास सुनावला होता.

तसेच तीन वर्षांच्या तुरुंगवासासोबत तरुणाला कोर्टाने दंडही सुनावला होता. दरम्यान, पाश्चिमात्य पद्धतीनुसार ‘मधलं बोट’ अर्थात ‘मिडल फिंगर’ दाखवणं हे असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जातं. अशा अनेक घटना सातत्याने घडल्याचे उघडकीस येत आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे ट्रॅफिक सिग्नलवर झालेल्या वादातून एका महिलेला मधलं बोटं दाखवून शिवीगाळ करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं होतं. न्यायालयाने तरुणाला दोषी ठरवत 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

महत्त्वाच्या बातम्या
शेन वॉर्नचा शेवटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांना अश्रू झाले अनावर
केंद्रीय यंत्रणांनी थेट ‘मातोश्री’लाच घेरले; चारही बाजूंनी केली कोंडी, ठाकरेंची ‘ही’ खास माणसं रडारवर
स्पेशल.. स्पेशल..! ‘मुळशी पॅटर्न’ मधील अभिनेत्रीला शेतीतून मिळतो कोटींचा नफा, शेतीचे प्रयोग वाचून थक्क व्हाल…
टीम इंडियाचा स्टार खेळाडू करणार लग्न, जाणून घ्या कोण आहे त्याची ‘ही’ धाकड गर्ल?

क्राईम इतर राज्य

Join WhatsApp

Join Now