Share

pune : आईवडिलांना घरच्या बाहेर पाठवलं अन् मुलीचे कपडे काढत…; पुण्यात उद्योजकाचं धक्कादायक कृत्य

rajendra gaikwad

pune man physical abuse 13 year old girl  | गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अनेक धक्कादायक घटनाही समोरं येत आहे. अशात आता पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण खळबळ उडाली आहे.

चाकण परिसरातील एका प्रसिद्ध उद्योजकाने ऑडिशन घेत असल्याचे सांगत १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. त्यानंतर त्या मुलीने याबाबत आईला सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. आता याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी उद्योजक आता फरार झाला आहे. राजेंद्र गायकवाड असे त्या उद्योजकाचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा मुलीच्या घरी आला होता. यावेळी त्याने मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देतो असे सांगितले. त्याने आई ऑडिशन घेतो म्हणत आई वडिलांना घराच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने मुलीला कपडे उतरवायला लावले.

मुलीने कपडे काढल्यानंतर त्याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबद्दल कोणालाही सांगितले तर जीव घेईल अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. या सर्व प्रकारामुळे पीडिता खूप घाबरली होती. घडलेला हा सर्व प्रकार तिने तिच्या आईला सांगितला.

त्यानंतर आईवडिलांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये जात राजेंद्र गायकवाड या उद्योजकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्या उद्योजकाविरोधात गुन्हा केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

महत्वाच्या बातम्या-
solapur : सोलापूरच्या आजोबांनी ४६ वर्षांत केले ८५ लग्न, कारण वाचून बसेल धक्का
virat kohli : भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यासाठी विराटने घेतला मोठा निर्णय; BCCI ला सांगीतलं सुद्धा नाही
ajit pawar : अजित पवारांनी काढली उद्धव ठाकरेंच्या मागणीतील हवा, राऊतांनाही सुनावले खडे बोल; म्हणाले…

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now