Share

याला म्हणतात शिवरायांचा कट्टर मावळा! महाराजांचा वारसा जपण्यासाठी बांधलं किल्ल्यासारखं घर

fort

खामगाव दौंड येथील शिवप्रेमी युवकाने ऐतिहासिक किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती असलेले घर बांधले आहे. पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने हे घर पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे. तांबेवाडीकडे जाताना खामगाव घरातील रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेले घर प्रवाशांचे सहज लक्ष वेधून घेते. व्यवसायाने पशुवैद्य असलेल्या नीलेश पंढरीनाथ जगताप यांनी हे घर बांधले आहे.

आपल्या प्रत्येकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आपण अनेकदा पाहतो. असे प्रत्यय आपल्यालाही येतात. छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी अनेकजण विविध प्रयोग करताना आपण पाहतो. अशाच एका प्रयोगात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी थेट किल्ल्याच्या आकाराचे घर बनवले आहे.

दौंड तालुक्यातील खामगाव परिसरात हा प्रयोग करण्यात आला आहे. हे घर सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. नीलेश पंढरीनाथ जगताप असे त्या तरुणाचे नाव असून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी त्याने हे घर बांधले आहे.

नीलेश जगताप हे शेतकरी कुटुंबातील असून ते व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. पुणे जिल्ह्यातील हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा. या शिवप्रेमी तरुणाने किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. ऐतिहासिक किल्ल्यासारखे दिसण्यासाठी घराच्या बाहेरील भागात चिरा जांभा दगड बसविण्यात आला आहे.

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा परम भक्त आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी घर बांधण्याची कल्पना माझ्या मनात डोकावली. हे घर बांधण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च झाले असून ते बांधण्यासाठी दोन वर्षे लागली आहेत. तसेच या घराला आतून पारंपारिक वाड्याचे स्वरूप देण्यात आले असून घराचे छत उतारासारखे करण्यात आले आहे. मला किल्ले बांधणे आणि किल्ले पाहणे आवडते. लहानपणापासूनच मला महाराजांच्या विचारांचा वारसा लाभल्याने मी हे घर बांधले आहे.

येणा-या पिढ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेऊन शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेले जावेत, हाच हे घर बांधण्याचा उद्देश आहे. ही वास्तू मी पंचतारांकित इमारतीसारखी केली असून छत्रपतींचा वारसा जपला जाईल, असे निलेश जगताप यांनी म्हटले आहे.

निलेशने हा दगड रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथून आणला असून त्या घराभोवती बुरूजांचा आकार देण्यात आला आहे. प्रवेशद्वाराजवळ स्वागत कमानही बांधण्यात आली आहे. बाहेरून कंदील आकाराचे दिवे लावण्यात आले आहेत. घराच्या बाजूला बागही लावण्यात आली आहे.

या घराचा दरवाजा मोठा करण्यात आला आहे. यासोबतच महाराजांच्या काळातील पारंपरिक तुळशी वृंदावनही उभारण्यात आले आहे. हे घर सुमारे 2577 स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. देवघर, हॉल, 3 बेड, किचन, स्टोअर रूम, घराच्या आत बाथरूम पंचतारांकित हॉटेलप्रमाणे बांधले आहे. स्वयंपाकघरात धूर काढण्यासाठी आयलँड फायरप्लेस आणि अत्याधुनिक डोअरबेल कॅमेरा आहे.

छतावरती कौलारू बांधकाम केले आहे. घराच्या मधोमध मोकळी जागा ठेवली असून चारही बाजूने छताला उतार देण्यात आला आहे. कुटुंबीयांना घराच्या आतमध्ये ऊन, वारा ,पाऊस अनुभवता यावा हा त्यामागचा उद्देश आहे.

महत्वाच्या बातम्या-
दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी, रात्री नवऱ्याला समोसा खाऊ घातला अन् त्यानंतर…
Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या
bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now