pune guy order 28 lakh rupees food | सध्याच्या ऑनलाईन जगात कोणतीही गोष्ट मागवणे खुप सोपे झाले आहे. स्विगी, झोमॅटो यांच्यामार्फत लोक जेवण ऑर्डर करताना दिसून येतात. दोन्ही कंपन्या चांगल्या सुविधा देत असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात झोमॅटो स्विगीवरुन जेवण मागवतात.
ऑनलाइन ऑर्डर देताना लोक त्यांच्या आवडत्या डिशची ऑर्डर देतात आणि ते आवडीने खातात. त्याच वेळी, असे बरेच लोक आहेत जे जवळजवळ दररोज बाहेरून काहीतरी ऑर्डर करून खातात. अशात झोमॅटोने आपला वर्षभरातील ऑर्डर्सचा एक अहवाल सादर केला आहे.
पण हा अहवाल एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आला आहे, ते कारण म्हणजे पुण्याचे पठ्ठ्याने एका वर्षात केलेल्या ऑर्डर्स. पुण्यातील एका व्यक्तीने झोमॅटोवरुन तब्बल २८ लाख रुपयांच्या ऑर्डर्स केल्या आहेत.
तेजस असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्यामध्ये त्याने २५ हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या किंमतीचे फक्त पिझ्झाच ऑर्डर केले आहे. त्याच्यासोबतच इतर ग्राहकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात झोमॅटोवरुन ऑर्डर करत पैसे खर्च केले आहे.
झोमॅटोने २०२२ चा एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, २०२२ मध्ये ग्राहकांनी प्रत्येक मिनिटाला १८६ बिर्याणी ऑर्डर केल्या आहेत. त्यामुळे बिर्याणी हा झोमॅटोवरील ग्राहकांचा सर्वात आवडता पदार्थ ठरला आहे. स्विगीवरही बिर्याणीच सर्वात आवडता पदार्थ ठरला आहे.
झोमॅटोच्या अहवालात लोकांचा दुसरा सर्वात आवडता पदार्थ हा पिझ्झा ठरला आहे. २०२२ मध्ये ग्राहकांनी प्रत्येक मिनिटाला १३९ पिझ्झा ऑर्डर केले आहे. झोमॅटो पिझ्झावर अनेक प्रकारच्या ऑफर्स देत असतं, त्यांचाही फायदा लोकांनी घेतला आहे.
अशात दिल्लीतील एका ग्राहकाने तर २०२२ मध्ये ३३०० वेळा झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर केले आहे. तर दुसऱ्या एका ग्राहकाने एका वर्षात १०९८ केक ऑर्डर केलेत. तर एकाने झोमॅटोवरुन प्रत्येकवेळी धन्यवाद मेसेज येतो, त्यामुळे त्याने थेट कंपनीकडे याची तक्रार केली आहे.
एकंदरीत पुन्हा एकदा बिर्याणी सर्वात आवडत्या खाद्यपदार्थांच्या यादीत शीर्षस्थानी आहे. सध्या दिल्लीत राहणाऱ्या अंकुरचे झोमॅटोने वर्षातील सर्वात मोठे खब्बू म्हणून वर्णन केले आहे. यामध्ये अंकुरने जास्तीत जास्त बिर्याणीची ऑर्डरही दिली आहे.
स्विगीने सुद्धा आपला एक अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये लोकांनी २०२२ मध्ये काय काय ऑर्डर्स दिल्यात याची माहिती दिली आहे. त्यामध्ये पुण्यातील एका बॉसने आपल्या सहकाऱ्यांसाठी तब्बल ७१ हजार रुपयांचे जेवण मागवले होते.
महत्वाच्या बातम्या-
कॅमेरा दिसताच तुझी मुले हात का जोडतात? रितेशच्या उत्तराने जिंकली सगळ्यांची मने
आंबेडकरांसाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार, पण…; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
nagraj manjule : सैराट बनवताना ‘या’ कारणामुळे खुपच घाबरले होते नागराज मंजुळे; स्वत:च केला अनेक गोष्टींचा खुलासा