pune : आजची पुण्यातील मोठी बातमी म्हणजे चांदणी चौकातील पूल अखेर पाडण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्यात येणार असल्याचं बोललं जातं होतं. अखेर पूल जमीनदोस्त करण्यात आला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास हा पूल पाडण्यात आला.
सध्या याचे व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी आधीच करण्यात आली होती. खबरदारी म्हणून काल रात्री 11 पासून मुंबई – बंगलोर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास हा पूल पाडण्यात आला.
ड्रिगर दाबताच अवघ्या सहा सेकंदात हा पूल जमीदोस्त झाला. मात्र हा पूल जरी पडला असला तरी त्याचा सांगडा शिल्लक राहिल्यानं आता तो हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशातच एक वेगळी बातमी समोर येतं आहे. ‘स्फोटकांचा वापर करुनही चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त झाला नसल्याचं बोललं जातं आहे.
याबद्दल खुद्द एडिफाईज कंपनीचे मुख्य अभियंते आनंद शर्मा यांनी सांगितलं की, “आमच्या अंदाजानुसार जास्त स्टील या पूलाच्या बांधकामावेळी वापरण्यात आलं होतं. विशेष बाब म्हणजे, हे स्टील दोन्ही बाजूंनी असलेल्या दगडांमध्ये फिक्स करण्यात आल्यानं स्टीलचं हे स्ट्रक्चर स्फोटानंतर पूर्णपणे खाली आलं नाही.’
दरम्यान, ‘सन १९९२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं हा पूल अत्यंत मजबूत असा बनला होता. यामुळे आज सुमारे १३०० स्फोटकं वापरुन स्फोट केल्यानंतरही तो पूर्णपणे खाली कोसळला नसल्याच एडिफाईज कंपनीचे मुख्य अभियंते आनंद शर्मा यांनी स्पष्टचं सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कंपनीने नोएडामधील ट्विट टॉवर जमीनदोस्त केले, त्याच इडिफीस कंपनीला हा पूल पाडण्याचे काम देण्यात आले. आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनासाठी हा पूल पाडण्याचे काम करण्यात आले. हा पूल पाडण्यासाठी सुमारे ६०० किलोची स्फोटके वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Buldhana: महाराष्ट्रात जंगलराज! मुल चोरीच्या संशयावरून तृतीयपंथीला बेदम मारहाण
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
bjp : बारामतीत पवारांचा करेक्ट कार्यक्रम! भाजपने राष्ट्रवादीचा मोहराच फोडला, आक्रमक महिला नेत्याने हाती घेतलं कमळ