राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. यातील जळगाव जिल्ह्यात लागलेल्या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. या जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिंदे गटाचा पराभव झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहिल्यास, भाजपला ६, शिवसेनेला ५, राष्ट्रवादीला ५, काँग्रेसला ५, इतरला ३ जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे गटाला शून्य जागा मिळाली आहे. शिंदे गटाला इथे पराभव स्वीकारावा लागला.
चाळीसगाव एरंडोल, अमळनेर व रावेर तालुक्यात झालेल्या २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलने ६ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पॅनल प्रत्येकी ५ जागांवर विजय मिळाला, तर इतर पक्षाच्या पॅनलला ०३ जागेवर विजय मिळाला आहे.
तर इतर पक्षाच्या पॅनलला ०३ जागेवर विजय मिळाला आहे. मात्र जिल्ह्यात शिंदे गटाच्या एकाही पॅनलला विजय मिळवता आलेला नाही, त्यामुळे शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रावेरमध्ये काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या पॅनलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कभी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी देखील आपल्या मतदारसंघात आपला प्रभाव कायम ठेवत ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे वर्चस्व सिद्ध केले आहे.
एरंडोल तालुक्यात मात्र शिवसेना-भाजप पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे. चाळीसगाव तालुक्यात भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप पॅनल चे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. तर शिंदे गटाला या जिल्ह्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला.