इंटरनेटमुळे अख्खं जग आता आपल्या मुठीत आलं आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून जनसंपर्क देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातूनच अनेकदा ऑनलाइन मैत्री देखील होतात. मात्र अलीकडे अशी अनेक प्रकरण समोर आली आहे की, अनोळखी व्यक्तींशी केलेली मैत्री ही जिवावर देखील बेतली आहे.
असच काहीच प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. तुमचाही विश्वास बसणार नाही, मात्र PUBG गेम खेळताना झालेली मैत्री अंगलट आली आहे. PUBG गेम खेळताना एक तरुणी चक्क दोन तरुणांच्या प्रेमात पडली. आणि पुढ काय झालं हे तुम्हीच वाचा… संपूर्ण प्रकरण वाचून नक्कीच तुमची झोप उडेल.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील हल्दवानी येथे हे प्रकरण घडलं असल्याची माहिती मिळत आहे. PUBG गेम खेळताना तरुणीची राजस्थानमधील एका तरुणासोबत मैत्री झाली होती. यानंतर दोघांनीही फोनवर गप्पा मारू लागली. हळूहळू यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
धक्कादायक बाब म्हणजे काही महिनाभरापूर्वी त्या तरुणीची पबजी खेळत असताना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे राहणाऱ्या आणखी एका तरुणाशी मैत्री झाली. त्याही तरुणाच्या प्रेमात ही तरुणी अखंड बुडाली. खूप दिवस हे प्रकरण सुरू राहिले. त्यानंतर या तरुणीने दोन्ही तरुणांना हल्द्वानीला भेटण्यासाठी बोलावले.
पहिल्यांदा भेट होणार या आनंदात दोन्ही तरुण हल्दवानी येथे आले. पुढं घडलं असं की, दोन्ही तरुण आमनेसामने आले. दोघे त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड म्हणाले. यावरूनच त्या दोन्ही तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बघता बघता दोघांमध्ये मारहाण झाली. अन् हे प्रकरण थेट पोलिस स्टेशनमध्ये गेलं.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण PUBG चे प्रो प्लेअर होते, या दोघांच्या खेळामुळे तरुणी त्यांच्याकडे आकर्षित झाली. बघता बघता ती तरुणी दोघांसोबत प्रेमाचा हा खेळ खेळू लागली. त्यातूनच हे धक्कादायक प्रकरण घडलं असल्याच पोलिसांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
लालपरीने पुन्हा सिध्द करून दाखलं! दीड महिन्यात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; आकडा वाचून चकीत व्हाल
‘धर्मवीर’ चित्रपटातील ‘तो’ सीन सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी चित्रपटगृह सोडलं; जाणून घ्या यामागील कारण…
आजी – माजी मुख्यमंत्री आखड्यात! मुख्यमंत्र्यांच्या विराट सभेवर बरसले फडणवीस; ‘असा’ केला पलटवार
उर्मिलासोबतच्या नात्यावर महेश कोठारेचा मुलगा आदिनाथने केला मोठा खुलासा; म्हणाला, सोशल मीडियावर….