prtap sarnaik : मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये वादाची ठिणगी? पूर्वेश सरनाईकांचं ट्विट चर्चेत

prtap sarnaik : आज शिंदे गटाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली अन् सर्वांच्याच भुवया उंचवल्या. खरं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकार स्थापन केलं. मात्र आता शिंदे गटात खटके उडतं असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहे. अशीच बातमी नुकतीच समोर आली.

एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. ओवळा-माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदारासाठी सोडावा यासाठी मुख्यमंत्री शिंदेकडून दबाव टाकला जात आहे. मात्र प्रताप सरनाईक यांना हे मान्य नसल्याने दोघांमध्ये भांडण झालं असल्याचं बोललं जातं आहे.

सरनाईक यांचा ओवळा माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांना कळली. त्यानंतर सरनाईक यांनी शिंदे यांच्याशी संवाद साधल्यानंतर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आसल्याची माहिती मिळाली.

यावरून आता राजकारण तापलं आहे. या सर्व प्रकारावर अद्याप शिंदे यांनी सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र प्रताप सरनाईक याचे चिरंजीव पूर्वेश सरनाईक यांनी ट्विटरवर एक मेसेज टाकला आहे. पूर्वेश यांच्या ट्विटने या प्रकरणाला वेगळेच वळण लागलं असल्याचं बोललं जातं आहे.

 

 

पूर्वेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो टाकून !! दो दिल और एक जान है हम !! असं ट्विट केलं आहे. पूर्वेश यांच्या ट्विटने आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहे. यावर अद्याप कोणत्याही नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यात खरा वाद झाला आहे का? हे अद्याप सविस्तर समजू शकलेलं नाहीये. मात्र आता पूर्वेश सरनाईक यांनी केलेलं सूचक ट्विट चर्चेचा विषय बनला आहे. सध्या राजकीय वर्तुळात याच ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या
eknath shinde : “मुख्यमंत्री साहेब माझ्या बापाला वाचवा”, लेकीचं मुख्यमंत्र्यांना काळजाचा ठोका चुकवणार पत्र, वाचा नेमकं काय पत्रात?
Shiva temple : शिवमंदिरात घुसले चोरटे, सोने-चांदी चोरल्यानंतर दानपेटीला हात लावताच घडलं असं काही..
Optical Illusions: या फोटोत सर्वात आधी तुम्हाला काय दिसतंय? चेहरा की उंदीर? यावरून ठरतो तुमचा स्वभाव, वाचा..