आजवर लग्नाचे, लव्ह स्टोरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. एकदम हटके स्टाईलने लग्नात एन्ट्रीपासून ते हजारोंच्या गर्दीसमोर प्रपोज करण्यापर्यंतचे व्हिडिओ सोशल मीडियात खूप गाजतात. परंतु एक वेगळाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय. (Proposed in front of the girl’s father)
व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या मैत्रिणीला प्रपोज करतो आहे. परंतु कल्पना करा, प्रपोज करत असताना त्या मुलीच्यामागे तिचे वडील आले तर…आहे ना गंमत! असाच प्रकार घडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
तलावाच्या मधोमध असणाऱ्या अरुंद वाटेवर एक मुलगी उभी आहे. त्या ठिकाणी समोरून तिचा मित्र येतो. तो त्या मुलीला प्रपोज करतो. नेमकी त्याच वेळी त्या मुलीच्या मागच्या बाजूला थोड्या अंतरावर तिचे वडील हा सगळा प्रकार बघत आहेत.
https://www.instagram.com/reel/CfzkHF7F4oQ/?utm_source=ig_embed&ig_rid=2820e507-a3c4-490d-a4b9-c7c3e480143a
परंतु हे दृश्य बघून मुलीच्या वडिलांना आनंद झाल्याचे दिसते आहे. ते मुलीने होकार दिल्यानंतर, तिला चेअर्स करताना दिसत आहेत. असे दृश्य परदेशातल्या लोकांना आश्चर्यकारक वाटणारे नाही.
हे दृश्य परदेशात सहज वाटणारे असले तरी भारतात मात्र आजवर असे दृश्य साधारण आढळून आले नाही. उलट प्रेम प्रकरणाला विरोध, त्यातून वेगवेगळ्या भयंकर घटना घडताना दिसतात. या भयंकर गोष्टींना पाहून समाजातील विचार कोणत्या दिशेने चालले आहेत? हा प्रश्न २१ व्या शतकात जगणाऱ्या तरुणाईला पडतोय.
परंतु एका मुलीला तिच्या वडिलांसमोरच प्रपोज करणाऱ्या मुलाला मानलं पाहिजे. पठ्ठ्याने चक्क वडिलांसमोरच त्या मुलीला प्रपोज करून होकार देखील मिळवला. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर जोरदार आहे. युजर्सकडून या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
महत्वाच्या बातम्या-
पंढरपुरात वारकऱ्यांनी घेतला दाजींच्या हातच्या चहाचा आस्वाद, दानवेंचा चहा बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल
उपासमारीने ‘या’ देशाची झाली वाईट अवस्था, आंदोलकांचा राष्ट्रपती भवनावर हल्ला, राष्ट्रपती झाले फरार
शिंदे गटाला समर्थन देणं तानाजी सावंतांना भोवलं, उद्धव ठाकरेंनी केली मोठी कारवाई