असाच एक धक्कादायक घडल्याचं पुन्हा उघडकीस आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. तुम्हाला वाचून धक्का बसेल मात्र, दारूबंदी अधिकाऱ्याचाच अति दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
वाचा नेमकं घडलं काय?
ही घटना बुधवारी घडली असल्याची सध्या माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादक म्हणून कार्यरत होते. त्यांना अति दारु पिण्याची सवय होती.
दरम्यान, बुधवारी माने यांनी अति दारु सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
मात्र मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हा दारु अतिसेवन केल्यामुळे झाला आहे. सध्या राजगड जिल्ह्यात याच प्रकणारची जोरदार चर्चा आहे. अलीकडे राज्यात दारूचे प्रमाण अधिक वाढलेले पाहायला मिळत आहे. यामुळे अति दारू प्यायल्याने मृत्यू देखील होतं असल्याच्या घटना घडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या