बॉलिवूड चित्रपट बनवण्यात एका निर्मात्याचा मोठा हात असतो. निर्मात्याशिवाय चित्रपट बनवणे सोपे नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक निर्माते आहेत ज्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामुळेच त्याची कमाईही चांगली होते. असे अनेक निर्माते आहेत ज्यांची कमाई बॉलिवूड स्टार्सपेक्षा जास्त आहे.(Producer, Producer Film, Director, Dharma Production, Karan Johar, Gauri Khan, Ekta Kapoor, Aditya Chopra, Sajid Nadiadwala)
एवढेच नाही तर काही निर्माते चित्रपट बनवून तसेच जाहिरातींच्या माध्यमातून कमाई करतात. चला तर मग जाणून घेऊया बॉलीवूडच्या लोकप्रिय आणि मोठ्या निर्मात्यांच्या नेट वर्थबद्दल. या यादीत करण जोहर, एकता कपूरपासून ते शाहरुख खानची पत्नी गौरी खान यांचा समावेश आहे.
करण जोहर हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट निर्माता आहे. करण हा दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. करणच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव धर्मा प्रॉडक्शन आहे. करणने या बॅनरखाली अनेक चित्रपट बनवले आहेत. करणच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, करणची एकूण संपत्ती १४५० कोटी आहे.
करणचा मासिक पगार 10 कोटींहून अधिक आहे आणि वर्षभरासाठी १०० कोटींहून अधिक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तो जाहिराती आणि टीव्ही किंवा शो होस्ट करून देखील कमाई करतो. शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही इंटिरिअर डिझायनर तसेच निर्माती आहे. गौरीने शाहरुखच्या बहुतेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, गौरीची एकूण संपत्ती १६०० कोटी आहे, ज्यामध्ये तिच्या प्रॉडक्शन हाऊसची कमाई तसेच तिच्या डिझाइनिंग कमाईचा समावेश आहे. एकता कपूर पूर्वी टीव्ही शोजची निर्मिती करायची, पण आता ती चित्रपट, वेब सीरिजची निर्मितीही करते. एकताने तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक हिट शो आणि चित्रपट दिले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, एकता कपूरची एकूण संपत्ती ९५ कोटी आहे. एकता महिन्याला १ कोटींहून अधिक आणि वर्षाला १२ कोटींपर्यंत कमावते. आदित्य चोप्रा बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. आदित्यने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. आदित्यच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तो ६,३५० कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.
साजिद नाडियादवाला हे निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहेत. साजिदने त्याच्या करिअरची सुरुवात निर्माता म्हणून केली आणि त्यानंतर २०१४ साली किक या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. साजिदच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव नाडियादवाला ग्रॅंडसन आहे. साजिदच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तो ३७ कोटींचा मालक आहे.
महत्वाच्या बातम्या
टीम इंडियातील ‘या’ 5 फ्लॉप क्रिकेटर्सच्या बायका आहेत खुपच सुंदर, बॉलिवूड अभिनेत्र्याही पडतील फिक्या
रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतर कोण उचलणार संघाची जबाबदारी? प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा
देशी गायीच्या शेणापासून बनवले vedik plaster, जे उन्हाळ्यातही देते बर्फासारखा थंडावा, जाणून घ्या