producer kamal kishor mishra and wife | अनेकवेळा सेलिब्रेंटींची अशी प्रकरणे समोर येत असतात, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडते. आता अशीच एक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहे. पत्नीला धोका दिल्याचा आरोप तिने केला आहे.
सध्या पोलिसांनी कमलविरोधात तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. रिपोर्ट्सनुसार, निर्मात्याला त्याच्या पत्नीने कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी पत्नीने निर्मात्याला कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पणत्यावेळी त्याने गाडी थेट तिच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला होता.
कमल किशोर मिश्रा यांच्यावर आरोप आहे की, त्याने केवळ आपल्या पत्नीलाच आपल्या कारने धडक दिली नाही, तर कार तिच्यावरही अंगावरुन घालण्याचाही प्रयत्न केला. यानंतर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलिसांनी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्राविरुद्ध पत्नीला वाहनाने धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मिश्रा यांच्या पत्नीने त्यांना कारमध्ये दुसऱ्या महिलेसोबत बसलेले पाहिले. कारमध्ये निर्माता महिलेशी रोमान्स करत होता. दोघांना एकत्र पाहून पत्नीने गाडीची काच फोडली आणि त्याला बाहेर येण्यास सांगितले. यानंतर निर्माते कमल किशोर यांनी कार चालू केली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
अंधेरी त्यांच्याच घराच्या पार्किंग परिसरात मिश्रा यांची पत्नी जखमी झाली होती, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पत्नीच्या तक्रारीच्या आधारे मिश्राविरुद्ध अबोली पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कमल किशोर मिश्रा यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटांमध्ये ‘भूतियापा’, ‘फ्लॅट नंबर ४२०, ‘शर्मा जी की लग गई’, ‘देहाती डिस्को’ आणि ‘खली बाली’ या चित्रपटांची नावे आहेत. त्यांचे काही चित्रपटा हिट सुद्धा झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Bachchu Kadu : मंत्रिपद नाही, तर ‘या’ कारणामुळे ५० आमदार नाराज; बच्चू कडू यांचा मोठा खुलासा
Virat Kohli : विराट-सूर्यकुमार पुढे नेदरलँड्स पडले थंड, टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय
shivsena : राजकारण तापलं..! “….तर मी घरात घुसून मारेन,” अमेय खोपकरांचा शिवसेना नेत्यांना इशारा






