सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये होत असलेल्या युद्धासंदर्भात जगातील इतर देशांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ने देखील आपले मत मांडत एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रियंका चोप्रा नेहमीच जगात घडणाऱ्या विविध घटनेवर आपले मत मांडताना दिसत असते. सध्या रशियाने युक्रेन सोबत युद्ध सुरू केले आहे, या हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहेत. तिथली परिस्थिती एकंदरीत भीतीदायक आहे. रशियानं युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा निषेध करीत अभिनेत्री प्रियंका चोप्रानं मदतीचं आवाहन केलं आहे.
प्रियंका ने लिहिले आहे की, युक्रेनमध्ये सध्या खूप भीतीचं वातावरण पसरलं आहे. लोकं सध्या स्वतःचा आणि आपल्या प्रियजनांचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. आजच्या कलयुगात या आपत्तीजनक गोष्टी घडू कशा शकतात हे समजण्यापलिकडचं आहे.
तसेच म्हणते की, या युद्धामुळे एक गोष्ट मात्र लक्षात आली की भविष्यात कुठल्याच गोष्टीची आपण शाश्वती देऊ शकत नाही. सगळंच अनिश्चित बनत चाललं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, या युद्धाचे परिणाम जगभरात उमटणार आहेत. सगळ्यांनाच याचा सामना करावा लागणार आहे. तसंच, ही अशी परिस्थिती कुणावरही येऊ शकते, या युद्धाची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते. असे प्रियंका म्हणते.
तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मदतीच्या आवाहनाची पोस्ट शेअर करतानाच एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. हा युक्रेन-रशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा देणाऱ्या बातमीचा व्हिडिओ आहे. कसं लोकं अंडरग्राऊंड सब वे स्टेशन्समध्ये आपला जीव वाचवण्यासाठी दडून बसलेत, हे देखील चित्रण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो.
प्रियंका Unicf ची 2016 मधील ब्रॅंड अँम्बेसिडर होती. तिनं ‘Unicef’ या संस्थेच्या माध्यमातून या युद्धजन्य परिस्थितीत सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेता सोनू सूदने देखील युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप सोडवून आणण्याची विनंती भारतीय सरकारला केली आहे.