सध्या मनोरंजन क्षेत्रातून अनेक आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये मागील काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलने लग्न केले. तसेच अभिनेत्री मौनी रॉय, अंकिता लोखंडे, फरहान अख्तर यांचाही समावेश आहे. मात्र यामध्ये अनेक अभिनेत्रीने आणखी एक आनंदाची बातमी दिली. ती म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्राने. काही महिन्यांपूर्वी प्रियांका आई झाली आहे.
सध्या ती आई झाल्याचा आनंद घेत आहे. तसेच आई झाल्यापासून ती खूपच व्यस्त झाली आहे. याच दरम्यान, प्रियांकाच्या संबंधित एक बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये असे म्हंटले जात आहे की, प्रियांकाने तिची करोडोंची कार विकली आहे. ही बातमी समोर आल्यापासून अनेक लोकांना प्रश्न पडला आहे, की तिने कार का विकली असे?
जेव्हा केव्हा प्रियांका तिच्या आलिशान कार रोल्स रॉयस घोस्टमधून बाहेर पडायची, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर थांबायच्या. या कारला आणखी सुंदर बनवण्यासाठी प्रियांकाने अनेक आलिशान इंटिरियर्स आणि फॅन्सी गॅजेट्सचाही वापर केला होता. महत्वाचे म्हणजे तिने ही आलिशान आणि मौल्यवान कार विकली आहे.
खरंतर प्रियांकाने ही आलिशान कार २०१३ मध्ये खरेदी केली होती. तर प्रियांकाने तिची ही आलिशान कार बंगळुरूच्या एका व्यावसायिकाला विकल्याचे म्हंटले जात आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, प्रियांकाने ही आलिशान कार किती किंमतीला विकली आहे, याची माहिती अजूनही मिळालेली नाही. मात्र प्रियांकाने तिची आवडती कार विकण्याचा निर्णय घेतला. कारण तिच्या ही गाडी गॅरेजमध्ये बराच काळ पडून होती. तसेच प्रियांका लग्नानंतर अमेरिकेत शिफ्ट झाली आहे. तिथूनच ती आपला व्यवसाय आणि करिअर करत आहे.
प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये ही काम केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच प्रियांका‘द मॅट्रिक्स ४’ मध्ये दिसलेली होती. त्यानंतर आता ‘सीटाडेल’ आणि ‘टेक्स्ट फॉर यू’ वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. ही वेब सीरिज अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. सध्या यामध्ये व्यस्त आहे.
तसेच सध्या ती आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे तिच्या मुलीच्या नावावरून ही चर्चा सुरू आहे. मात्र प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी एका इव्हेंटमध्ये सांगितले की, “मुलीचे नाव अद्याप ठेवलेले नाही. पंडित जी जे नाव सांगतील ते ठेवले जाईल.”