बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या अभिनयामुळे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. त्यांना एकत्र पाहायला चाहते उत्सुक असतात. नुकतेच दोघेही आई-वडील झाले आहेत, पण हे जोडपे इथेच थांबणार नाही, त्यांचे मुलांबाबत खूप लांब आणि व्यापक नियोजन आहे.(Priyanka Chopra, Nick Jonas, Bollywood, Hollywood)
होय, हे जोडपे केवळ एका मुलावर समाधानी नाही. निकला एक नाही तर अनेक मुलं हवी आहेत. असे स्वतः निकने म्हटले आहे. निक जोनासने एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रियांका चोप्रा त्याच्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर भाग आहे आणि तो तिच्यासोबत एक मोठा परिवार करण्याचा विचार करत आहे. मुलांबद्दल बोलताना तो म्हणाला की हा खूप सुंदर प्रवास असणार आहे आणि मला प्रियांकाकडून अजून बरीच मुलं हवी आहेत.
त्याचबरोबर प्रियांकाही या बाबतीत कमी नाही. तिने स्वतः एका मुलाखतीत तिच्या मुलांबाबतच्या अपेक्षा सांगितल्या होत्या. प्रियंका चोप्राने एका मुलाखतीत मुलांबद्दल सांगितले होते की, तिला 11 मुले हवी आहेत. हे उत्तर दिल्यानंतर अभिनेत्री जोरजोरात हसायला लागली. ती पुढे म्हणाली की तिला एक संपूर्ण क्रिकेट टीम बनवायची आहे आणि क्रिकेट टीम बनवण्यासाठी ११ मुलांची गरज आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी २१ जानेवारीच्या रात्री घोषणा केली की ते सरोगसीद्वारे एका मुलाचे पालक बनले आहेत, परंतु मुलीचा जन्म १५ जानेवारीला झाला आहे. निक जोनास आणि प्रियांका चोप्राच्या मुलीचा जन्म सरोगेसीद्वारे १२ आठवड्यांपूर्वी झाला होता. प्रियांका आणि निक यांना एप्रिल २०२२ मध्ये बाळाचा जन्म होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी सर्व नियोजन केले. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा असे ठेवले आहे.
१ डिसेंबर २०१८ रोजी प्रियांका चोप्राने जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये हिंदू आणि नंतर ख्रिश्चन रितीरिवाजानुसार निक जोनासशी लग्न केले. लग्नाआधी दोघांनीही एकमेकांना बराच काळ डेट केल होत. लग्नानंतर प्रियांका चोप्रा आपल्या पतीसोबत बहुतेक वेळ अमेरिकेत राहते.
महत्वाच्या बातम्या-
परदेशात राहूनही प्रियांका चोप्राने भारतीय संस्कृती जपली, बाळाच्या पायात घातली ही गोष्ट
प्रियांका चोप्राने पुलमध्ये अंघोळ करताना शेअर केला फोटो, 39 च्या वयातही वाढवला इंटरनेटचा पारा
धक्कादायक! प्रियांका चोप्राचा पती निक जोनसला झालाय हा गंभीर आजार, डॉक्टर म्हणाले, मृत्यूही होऊ शकतो
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीचे नाव आले समोर, संस्कृत आणि ख्रिश्चन संस्कृतीचे मिश्रण g