बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती अमेरिकन गायक निक जोनस (priyanka chopra and nick jonas) सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे आहेत. दोघेही नेहमी काही ना काही कारणाने माध्यमात चर्चेत असतात. आताही या दोघांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रियंका आणि निक आई-बाबा झाले असून यासंदर्भात स्वतः प्रियंका चोप्राने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत ती आई झाल्याची माहिती दिली आहे. तिने लिहिले की, ‘आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की, सरोगसीद्वारे आम्ही आमच्या बाळाचे स्वागत केले आहे. आमच्या या खास क्षणाच्या वेळी आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहोत. त्यामुळे आम्ही तुम्हाला आमचा खासगीपणा (प्रायव्हसी) जपण्याची आदराने विनंती करत आहोत’.
प्रियंका आणि निक आईबाबा होण्याची योजना करत असल्याच्या अनेक बातम्या यापूर्वी समोर आल्या होत्या. तसेच प्रियंकाने एका मुलाखतीत बोलताना आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तिने आता सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिल्याची माहिती दिली आहे. प्रियंकाची ही बातमी समोर येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला आणि निकला शुभेच्छा देत आहेत.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस १ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकले होते. राजस्थानमध्ये पारंपारिक पद्धतीनुसार शाही अंदाजात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर प्रियंका पती निकसोबत अमेरिकेतच जास्त राहत आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोप्रा बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. २००० साली प्रियंकाने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने ‘थमिजन’ या तमिळ चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘द हीरो: लव स्टोरी ऑफ ए स्पाई’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने एकामागून एक अशा अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.
प्रियंकाला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच २०१६ साली तिला भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय टाईम मॅगझिनच्या जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये तिचाही समावेश करण्यात आला होता. तर फोर्ब्सच्या जगातील १०० सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीतही प्रियंकाच्या नावाचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या :
संगीत क्षेत्रावर कोसळला दु: खाचा डोंगर! सर्वात जेष्ठ गायिकेने पुण्यात घेतला अखेरचा श्वास
समंथा आणि नागाचैतन्य पुन्हा एकत्र येणार? अभिनेत्रीने उचलले मोठे पाऊल
जेव्हा स्मिता पाटीलच्या एका पोस्टरने घातला होता धुमाकूळ, हॅन्डपंपखाली करत होती अंघोळ