Share

तारक मेहताच्या टीआरपीबाबत रिपोर्टर रिटाने केला मोठा खुलासा, म्हणाली, “मला आजपर्यंत ‘हा’ खेळ समजला नाही”

मागील अनेक वर्षांपासून सब टीव्हीवर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो सुरू आहे. ही मालिका साल २००८ मध्ये सुरू झाली. या शोने मागील अनेक वर्षांपासून चाहत्यांना हसवले आहे. हा शो फक्त भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. या शोमधील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना खूप जवळचे आहे. त्याचबरोबर या कलाकारांना भूमिकेचा नावानेच ओळखले जाते.

 

त्याचबरोबर या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच जात आहे. मात्र तारक मेहता का उल्टा चष्मा शो सध्या खूप कठीण टप्प्यातून जात आहे. कारण हा शो काही कारणास्तव थांबला आहे. असे म्हंटले जात आहे की, या सध्या शोवर संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे या शोची टीआरपी दिवसेंदिवस कमी होत आहे.

 

मात्र या मालिकेबाबत अशा बातम्या येत आहेत की आता प्रेक्षकही त्याचा कंटाळा करू लागले आहेत. आता असा प्रश्न पडला आहे की, या शोचे निर्माते जबरदस्तीने खेचत आहेत का? आणि प्रेक्षक ते बघून कंटाळतात का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे अभिनेत्री प्रिया आहुजाने दिली आहेत. प्रियाने या टीव्ही मालिकेत रीटा नावाच्या रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. तसेच ती या मालिकेच्या दिग्दर्शकाची पत्नी देखील आहे.

 

प्रिया म्हणाली की, “मला आजपर्यंत टीआरपीचा खेळ समजला नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो बंद करायची वेळ अजून आली नाही. या मालिकेच्या टीआरपीमध्ये नक्कीच चढ-उतार आले असतील. कारण आजकाल प्रेक्षक टीव्ही सीरियल्स व्यतिरिक्त खूप काही पाहत आहेत. त्यामुळे ठराविक वेळी नॅशनल टीव्हीवरची मालिका पाहणे कमी झाले. तर ॲपवर जाऊन मालिका पाहणे वाढले आहे.

 

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, मागील काही वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणी या शो पासून लांब आहे. तर नट्टू काक म्हणजेच घनश्याम नायक यांचे ही निधन झाले. त्यामुळे या शोची टीआरपी कमी झाली आहे की काय? याबाबत ही प्रियाला प्रश्न विचारण्यात आला.

 

या प्रश्नावर उत्तर देत प्रिया म्हणाली की, “हो, असे काही प्रेक्षक आहेत. ज्यांना विशिष्ट व्यक्तिरेखा पाहायला आवडते. पण मला वाटते की ९०% प्रेक्षक हे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे एकनिष्ठ प्रेक्षक आहेत. मात्र परिणाम ही थोड्या प्रमाणात झाला आहे.” आता हे पाहणे महत्वाचे असेल की, दिशा वाकाणी कधी या मालिकेत परत येईल.

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now