क्रिकेटपटू पृथ्वी पंकज शॉ (Prithvi Pankaj Shaw) याने मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात 10.5 कोटी रुपयांना प्रीमियम फ्लॅट खरेदी केला आहे. कागदपत्रांवरून हे स्पष्ट होते की, पृथ्वी शॉ याने केसी रोड येथे एमजे शाह ग्रुपच्या प्रोजेक्ट 81 ऑरिएटच्या आठव्या मजल्यावर फ्लॅट खरेदी केला आहे. कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट पृथ्वी शॉला पिरॅमिड डेव्हलपर्सने विकले आहे आणि शॉने ते खरेदी करण्यासाठी सुमारे 52.50 लाख रुपये स्टांप ड्यूटी भरली आहे.(Prithvi Shaw bought apartments worth crores in Mumbai)
मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉच्या नवीन फ्लॅटचे कार्पेट एरिया 2.209 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे आणि टेरेसचे टेरेस एरिया 1,654 स्क्वेअर फूट आहे. पृथ्वी शॉ यांना अपार्टमेंटसह तीन पार्किंग लॉट मिळाले आहेत. फ्लॅट खरेदीशी संबंधित व्यवहार 31 मार्च रोजी झाला आणि 28 एप्रिल रोजी नोंदणी झाली. पृथ्वी शॉ आणि पिरॅमिड डेव्हलपर्स यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
22 वर्षीय पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने फेब्रुवारी 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. त्याच वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1.2 कोटींना विकत घेतले होते. शॉ सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो.
देशातील सर्वात मोठ्या आणि महागड्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मुंबईची गणना होते. मार्च महिन्यात मुंबईत 16,726 वाहनांची विक्री झाली. वास्तविक, महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिलपासून स्टांप ड्यूटी 2.5 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे मार्चमध्ये विक्री नोंदणीचे प्रमाण अधिक दिसून आले.
पृथ्वी शॉचे वडील पंकज शॉ मूळचे बिहारमधील गया जिल्ह्यातील मानपूर गावचे आहेत. पण पृथ्वीचा जन्म ९ नोव्हेंबर १९९९ रोजी मुंबईतील विरार भागात झाला असून त्याचा बिहारशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. सध्या पृथ्वीचे वडील पंकज हे देखील मुंबईत राहतात. पृथ्वीच्या जन्मापूर्वी ते मुंबईत आले होते आणि तिथे कपड्यांचे दुकान चालवत होते. आता पृथ्वीचे आजोबा अशोक शॉ आणि आजी रामदुलारी बिहारच्या गया जिल्ह्यातील मानपूर, शिवचरण लेनमध्ये राहतात.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून धक्कादायक प्रकार आला समोर, विजेत्या पृथ्वीराज पाटील याला बक्षीसच मिळाले नाही
21 वर्षानंतर कोल्हापूरला मिळाली महाराष्ट्र केसरीची मानाची गदा; अंतिम लढतीत पृथ्वीराज पाटील विजयी
माणसांमध्ये राहत आहेत एलियन्स, पृथ्वीवर हल्ला करण्याची करत आहेत तयारी, प्रोफेसरच्या दाव्याने खळबळ
पृथ्वीराज चव्हाण नाही तर ‘हे’ वेगळंच नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आलं समोर; वाचून धक्का बसेल