संजय राऊत (Sanjay Raut): सामना या मुखपत्राचे संपादक शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक झाली. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे. ते अटक होण्याआधी दिवसभर राजकारणात व्यस्त राहत होते. आर्थर रोड तुरुंगातील त्यांची दिनचर्या समोर आली आहे.
सामान्य कैद्यांचे जीवन कसे असते हे आपल्याला माहित आहे. पण संजय राऊत सुद्धा सामान्य कैद्यांप्रमाणेच असेल का? हा प्रश्न सर्वाना पडला असेलच. त्याचेच उत्तर सूत्रांकडून मिळाले आहे. संजय राऊत यांचा ऑर्थर रोड कारागृहातील कैदी नंबर 8959 आहे. संजय राऊत यांना इतर सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. संजय राऊतांची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना इतर कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले आहेत असेही समजले आहे.
तुरुंगात असूनही संजय राऊत सर्व घडामोडींवर लक्ष देत आहेत. आर्थर रोड तुरुंगात संजय राऊत ग्रंथालयातील वर्तमानपत्र, पुस्तके वाचतात. याशिवाय टीव्हीवर बहुतांश वेळ ते टीव्हीवरील बातम्यादेखील पाहतात. संजय राऊत यांनी तुरुंगातील दुकानातून एक वही व पेन घेतला आहे. ते पत्रकार असल्याने त्यांना लिहायचा छंद आहे. ते लिहण्यात व्यस्त असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे.
वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या वाचून व त्यावर विचार करून संजय राऊत वहीत आपले विचार लिहित असतात.त्यांचे ते लिखाण त्यांच्यापर्यंत मर्यादित राहिल, ते बाहेर छापण्यासाठी दिले जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संजय राऊत यांना औषधे व घरचे जेवण मिळत आहे. शुक्रवारी सुनील राऊत यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. बुधवारी सुनील राऊत यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये भेटण्याची परवानगी मागितली होती परंतु ती नाकारण्यात आली आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत संजय राऊत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राऊत यांची ईडी कोठडी 8 ऑगस्टला संपली होती. राऊत यांच्या अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नसल्याचे ईडीतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांची प्रकृती विचारात घेत त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : सच्च्या शिवसैनिकाचा जीव वाचवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आले धावून; केली ‘इतक्या’ लाखांची मदत
Twitter: आधी उद्धव ठाकरेंचा कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख, आता संजय शिरसाठ म्हणतात, ‘टेक्निकल प्रॉब्लेम’
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच दिलं इंग्रजीत भाषण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिंदे गटातील ‘या’ बड्या आमदाराने उद्धव ठाकरेंना म्हटले कुटुंबप्रमुख; परत येण्याचे दिले संकेत?