शिक्षक हे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार देऊन त्यांना घडवत असतात. आपल्या विद्यार्थ्याने मोठा होऊन चांगली नोकरी मिळवावी, चांगला माणूस बनावं यासाठी ते शिक्षक विद्यार्थ्यांना मदतही करतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे नसतात तर ते शिक्षक विद्यार्थ्यांंना पैसे देतात.
अनेक शिक्षक हे समाजासमोर नवा आदर्श उभा करत असतात. पण आता बिजेपूर गावातील एका सरकारी शाळेतील मुख्यधापक चर्चेचा विषय ठरले आहे. शाळेचे मुख्यधापकांनी आपल्या पैशातून शाळेतील मुलांना विमान प्रवास करुन दिला आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे.
बिजेपूर गावातील शाळेतील ६ वी, ७ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीच्या शैक्षणिक सहलीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांना विमान प्रवासाचा आनंद घेता आला आहे. विमान बसायला मिळाल्यामुळे विद्यार्थी सुद्धा खुप खुश होते. कारण त्यातील प्रत्येक विद्यार्थी हे पहिल्यांदाच विमानात बसणार होता.
अनेक विद्यार्थ्यांनी या विमान प्रवासावर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहे. एक विद्यार्थी म्हणाला की, आम्ही आमच्या खेळाच्या मैदानावर आकाशात उडणाऱ्या विमानाकडे पाहायचो. तेव्हा ते खुप छोटे दिसायचे, पण ते जमिनीवर खुप मोठे दिसते. विमान प्रवासात आम्हाला खुप मजा आली.
शाळेचे मुख्यधापक किशोर कणसे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमच्यासोबत असेही काही मुले होती, जे खेड्यातून असल्यामुळे त्यांनी ट्रेनमधून सुद्धा प्रवास केलेला नव्हता. विमानात फिरण्याची कल्पना कोणी केली सुद्धा नव्हती. त्यामुळे माझी इच्छा होती की त्यांनी तो विमान प्रवास करावा.
तसेच पुढे ते म्हणाले की, विमानाने प्रवास करण्याची कल्पना गेल्यावर्षीच आली होती. मी तेव्हा विद्यार्थांना आग्र्याला नेले होते. त्यावेळी परतीच्या प्रवासात मुले ट्रेनमध्ये होती. ती खु उत्साही होती. त्यावेळी मुलांना विमानाने घेऊन जाण्याचा विचार माझ्या डोक्यात आला होता. विमान प्रवासासाठी त्यांनी स्वत:च्या बचतीतून ६० हजार रुपये खर्च करुन मुख्यधापकांनी मुलांना विमान प्रवास करुन दिला आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“फडणवीसांना बोलता येत नाही म्हणून त्यांनी कोकणातील कोंबडी चोर भाड्याने ठेवलेत”
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाला मोठा धक्का, ‘तो’ महत्वाचा दाखला न्यायालयाने नाकारला
स्मृती मंधानासाठी ऑक्शन कक्षात रंगले युद्ध, कोटींची बोली लावून विराटच्या संघाने मारली बाजी