Share

युक्रेनच्या राष्ट्रपतींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; काय झालं नेमकं संभाषण वाचा सविस्तर….

रशिया ने युक्रेन वरती हल्ला केल्यामुळे जागतिक पातळीवर सध्या चर्चेला उधाण आले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध कधी संपणार याकडे पूर्ण जगाचे लक्ष आहे. त्यातच आता रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ओलोदिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.

कीव्ह ढासळत असताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी उचललेलं हे पाऊल अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. संयुक्त राष्ट्रासमोर घेतलेल्या भूमिकेबद्दल रशियानं भारताच्या भूमिकेचं स्वागत केल्याननंतर झेलेन्स्की यांनी हे पाऊल उचललंय. त्यांनी सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधल्याची माहिती दिली.

त्यांनी म्हटले की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुरक्षा परिषदेत राजकीय समर्थनाची मागणी केलीय. रशियाला पाठिंबा देण्याऐवजी युक्रेनला मदत देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसंच रशियानं एक लाखांहून अधिक सैनिकांसह युक्रेनवर केलेल्या हल्ल्याची माहिती देऊन मदतीचं आवाहन केलं आहे. असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

दुसरीकडे या संभाषणाबाबत पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर विद्यार्थ्यांसहीत भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त केली. तसंच भारतीयांना सुरक्षित मायदेशी धाडण्यासाठी युक्रेन प्रशासनाकडून त्वरीत मदतीची मागणी केली आहे.

दरम्यान भारतानं संयुक्त राष्ट्रासमोर आपली भूमिका मांडताना सांगितलं होतं की, रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या या संघर्षावर मुत्सद्देगिरी आणि संवादातूनच तोडगा काढला जावा. भारताने संयुक्त राष्ट्रासमोर घेतलेल्या भूमिकेबद्दल रशियानं भारताच्या भूमिकेचं स्वागत केले होते.

अमेरिका, रशिया तसंच युक्रेन या देशांसोबतचे संबंध पाहता भारतानं आपली भूमिका कायम ठेवली आहे. युक्रेनवरील रशियाच्या लष्करी आक्रमणावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरुद्धच्या ठरावावर मतदानातही भारतानं सहभाग टाळला आहे. मात्र, भारत आणि रशिया हे दोन्ही देशांचे जवळकीचे संबंध आहेत. त्यामुळे, रशियाला लष्करी बळाचा वापर करण्यापासून रोखण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी आशा आंतरराष्ट्रीय समुदायाला लागलीय.

आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now