politics : महाराष्ट्राचे राजकारण शिंदे-ठाकरेंच्या वादाने ढवळून निघाले आहे. शिवसेना पक्षात एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे- ठाकरे वाद कोर्टापर्यंत पोहोचला. आणि शिवसेनेतील हे वाद अधिकच टोकाला गेले. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी पुन्हा या दोघांमध्ये रस्सीखेच झाली. शेवटी ठाकरेंनी यामध्ये बाजी मारली. त्यानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा राजकीय आखाडा रंगताना महाराष्ट्राने पाहिला आहे.
मात्र पुणे जिल्ह्यात शिंदे- ठाकरे यांच्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. राजकारणातील शिंदे- ठाकरे यांच्यातील मतभेद वाढून संबंध तुटल्याचे चित्र समोर असताना पुण्यातील आंबेगावात शिंदे आणि ठाकरे परिवारात सोयरीक जुळण्याची भन्नाट गोष्ट घडली आहे. या आडनावांचा गमतीशीर योगायोग घडल्यामुळे सध्या ही सोयरीक सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे.
जुन्नर तालुक्यातील वडगावसावाणी गावचे माजी शिवसेना विभागप्रमुख आणि सरपंच खंडेराव शिंदे यांचा पुतण्या विशालचे आंबेगावमधील साल गावच्या ठाकरे परिवाराची कन्या अनुराधाशी सोयरीक जुळले. जेव्हा शिंदे- ठाकरे दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळावे, म्हणून कोर्टात गेले. त्याच दरम्यान इकडे शिंदे आणि ठाकरे परिवाराची सोयरीक जुळली.
आठ दिवसांपूर्वी कांदेपोहेचा कार्यक्रम झाला. ठाकरे आणि शिंदे कुटुंबीयांमध्ये एकमत झाल्याने ही सोयरीक जुळून आली. नवरा मुलगा विशाल याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘लग्न जमले तेव्हा वाटलेही नव्हते की असे काय होईल, अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आनंद वाटतो.’
तसेच मुलाचे काका माजी शिवसेना विभागप्रमुख, निष्ठावंत शिवसैनिक खंडेराव शिंदे यांनी ज्या प्रकारे आमच्या इथे ठाकरे आणि शिंदे परिवार यांचे मनोमिलन झाले आहे. त्याच प्रकारे राजकारणातही शिंदे- ठाकरे एकत्र यावेत. त्यांचेही मिलोमिलन व्हावे, अशी भावना व्यक्त केली आहे.
त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी होणारा शिंदे- ठाकरे परिवाराचा हा विवाह सोहळा पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. शिंदेंची वरात आता ठाकरेंच्या दारी जाणार आहे. राजकारणात शिंदे- ठाकरे यांचे संबंध तुटल्याचे चित्र दिसत असले, रोज एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात असले तरी देखील सामान्य जनतेतून मात्र यांच्यात समेट घडून यावी, अशी आशा व्यक्त होतेय.
महत्वाच्या बातम्या-
Team India: …तर संजू सॅमसनने नक्कीच मॅच जिंकून दिली असती, वाचा शेवटच्या ओव्हरमध्ये नक्की काय घडलं?
Amol Mitkari : “धनुष्यबाण चिन्हावर उद्धव ठाकरेंचाच अधिकार होता, आहे आणि राहणार”; राज्यातील बड्या नेत्याने सांगीतले कारण
Pune Police: ‘माझ्या वरच्या फ्लॅटमध्ये मोदींची हत्या करण्याबाबत प्लॅन सुरू आहे’, एका कॉलने पुणे पोलीस हादरले