MNS : मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा दसऱ्या मेळाव्याबाबत महाराष्ट्रात जनतेला मोठी उत्सुकता लागली आहे. आधीच शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. आणि शेवटी कोर्टाचा निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर घेण्यात येणार आहे.
यादरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. पण यामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतल्याचे दिसते. मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका केली. त्यांनी एक व्यंगचित्र ट्विट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
‘मर्द छताड बॉम्ब, खंजीर कोथळा बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, पाठीत खंजीर खुपसला, बाप पळवणारी टोळी बॉम्ब, टोमणे मेळाव्याची तयारी सुरू..हसा चकट फू..,’अशाप्रकारे ट्विट करत मनसेच्या गजानन काळेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात होणाऱ्या भाषणाबाबत शिवसेनेला टोला लगावला.
‘साहेब आजच्या भाषणाचे मुद्दे काय असतील? असे उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणतात, त्याचीच तयारी चालू आहे. डिस्टर्ब करू नका, असं म्हटले आहे. अशा स्वरूपाचं व्यंगचित्र गजानन काळे यांनी ट्विट केलं. त्यामध्ये बॉम्बचे चित्र दाखवत वेगवेगळ्या मुद्द्यांचा उल्लेख त्यांनी केला आहे.
मागील काही काळापूर्वीही गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंवर अशाच प्रकारे टीका करणारे ट्विट केले होते. गजानन काळे हे मनसेचे युवा नेते असून महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून शिवसेना आणि इतर पक्षांवर जोरदार टीका करण्याची एकही संधी ते सोडताना दिसत नाहीत.
शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू असताना गजानन काळेंनी याबाबत टीका केली होती. तेव्हा ते म्हणाले होते, ‘कोणी मैदान देता का मैदान?, मुंबई शहर अजून भकास करायला त्याची लक्तर तोडायला यांना सत्ता हवी आहे. शिल्लक सेनेपासून मुंबईला वाचवा,’असे ट्विट करत काळेंनी त्यावेळी शिवसेनेवर निशाणा साधला होता.
महत्वाच्या बातम्या-
shinde group : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले तर ‘हे’ असणार शिंदे गटाचे नवे चिन्ह, आधीच केलीये पुढील तयारी
shivsena : शिंदे गटाचा मोठा दावा, आज शिवसेनेचे २ खासदार ५ आमदार शिंदे गटात जाणार, ठाकरेंना बसणार झटका
Shinde group : व्हॅनिटी व्हॅन, जेवणासाठी स्पेशल किचन, दसरा मेळाव्यानिमित्त शिंंदे गटाचा ‘शिंदेशाही थाट’