Share

Pravin Darekar: ‘मविआ’ला आणखी एक धक्का; दरेकरांची अजितदादा आणि आदित्य ठाकरेंना एकाचवेळी धोबीपछाड

pravin darekar new president of mumbai bank | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तांतराचा खेळ सुरु होता. त्यानंतर अखेर भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिंदेंनी आपले सरकार स्थापन केले आहे. असे असताना आता महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

राज्यातील सरकार गेल्यानंतर आता मुंबई बँकेतील सत्ताही महाविकास आघाडीच्या हातातून गेली आहे. आता मुंबई बँकेत सत्तांतर झाले असून भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबई अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे.

सहा महिन्यांपूर्वीच मुंबई बँकेत सत्तांतर झालेले पाहायला मिळत होते. दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने मुंबई बँकेतील सत्ता मिळवली होती. मुंबई बँकेत ऐकून २१ संचालक आहे. दरेकर हे मजूर म्हणून अपात्र ठरल्यानंतर संचालकांची संख्या २० झाली होती.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून एकूण १० संचालक आहे. पण आता राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे मुंबई बँकेचा अध्यक्ष बिनविरोध निवडून आला आहे. कारण राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते, त्याच पक्षाची सत्ता मुंबई बँकेतही असते, असे समीकरण आहे.

दरम्यान, प्रवीण दरेकर १९९७ पासून मुंबई बँकेचे संचालक म्हणून निवडून येत आहे. आधी प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती. बँकेच्या निवडणूकीत ते मजूर आणि सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते.

अशात मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. याप्रकरणी आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. पण आता भाजपचे सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी त्यांच्या निकवर्तीयांची या बँकेत नियुक्ती केली होती. पण आता दरेकर अध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी एकाचवेळी दोघांना धोबीपछाड दिल्याची चर्चा आहे.

महत्वाच्याा बातम्या-
Pune: पुण्यातीस एसटी चालकाने स्वतः मृत्यूला कवटाळले पण गाडीतील २५ प्रवाशांचे प्राण वाचवले
मराठी लोकं साऊथचे सिनेमे पाहायला सिनेमागृहात जातात पण मराठी चित्रपट का पाहत नाहीत? महेश मांजरेकरांचा सवाल
‘उद्या उठसूट कोणीही वेगळे होऊन म्हणेल आम्ही पक्ष आहोत, हे लोकशाहीसाठी घातक’; सरन्यायाधीशांची शिंदे गटाला चपराक

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now