Share

फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमध्ये उल्लेख केलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयाला टाळं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सनसनाटी आरोप केले होते. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह फडणवीसांनी आरोप केला. पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी हे आरोप केले होते. (pravin chavhan office is locked)

पेन ड्राईव्हमध्ये प्रवीण चव्हाण यांचे अनेक व्हिडिओ होते. फडणवीसांच्या या पेन ड्राईव्ह बॉम्बनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे आरोप फेटाळले आहे. अशात एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब असल्याचे म्हटले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर एका वृत्तवाहिनीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ते माध्यमांशी बोलणे टाळत होते. ३० वेळा फोन करुनही त्यांनी फोन उचलला नसल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे. तसेच कार्यालयात जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयाला टाळे असल्याचे लक्षात आले.

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर प्रवीण चव्हाण आपली बाजू माध्यमांसमोर मांडणं का टाळत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. अशात त्यांनी एक प्रतक्रिया दिली होती. माझा कोणत्याही सरकारशी संबंध नाही. माझ्याकडून कुठलंही असं काम झालेलं नाही, असे प्रवीण चव्हाण यांनी म्हटले आहे.

माझ्याकडून अशा प्रकारचं कुठलंही काम झालेलं नाही. मी अजून व्हिडिओ पाहिलेला नाही, आवाज ऐकला नाही. हे पोलिस नाही, तर फॉरेन्सिक विभाग तपासतात. याचा तपास बाहेरील राज्यातही करता येईल. कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही, तर सरकार ठरवतं, असेही प्रवीण चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी १२५ तासांच्या या स्टिंगमधील सर्वात महत्वाचा भाग २९ वेगवेगळ्या पेन ड्राईव्हच्या माध्यमांतून सादर केला आहे. भाजपमधील काही नेते टार्गेटवर असल्याचा आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या मुलांचेच लागले ‘वॉन्टेड’ पोस्टर; महाराष्ट्र हादरलं
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ‘मॅजिक’ दाखवणार? पहिल्या दीड तासात शिवसेनेचा फ्लॉप शो
उत्तराखंडमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, भाजप ३६ जागांसह आघाडीवर तर काँग्रेसला २८ जागा

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now