Share

राज्यात भाजपच सरकार येताच भाजप आमदाराच्या घरासमोर सापडलं मोठं घबाड; प्रकरण वाचून हादरल

bjp

राज्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. अडीच वर्ष सुरुळीत सुरू असलेलं ठाकरे सरकार अचानक कोसळलं. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे व्यक्ती म्हणून ओळखळे जाणारे एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे..!

अखेर भाजपशी हातमिळवणी करून राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर बसले अन् राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली. पुन्हा सत्तेत आल्याने भाजपमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे. भाजप पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळत आहे.

मात्र अशातच एक वेगळी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. आज पहाटे भाजप आमदाराच्या घरासमोर एक बॅग सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मांटुंगा येथे भाजपचे आमदार प्रसाद लाड हे राहतात. आज लाड यांच्या घराबाहेर सुरक्षारक्षकाला एक बॅग सापडली.

या घटनेने सध्या भाजपच्या गोटात त्याचबरोबर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या बॅगेमध्ये सोने, चांदीच्या मूर्ती आणि रोख रक्कम आढळली आहे. सध्या लाड यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान, याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे कुणीतरी ही बॅग सोडून पसार झाले असावे, असे प्राथमिक तपासातून समोर येत आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. यावर अद्याप लाड यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नाहीये. याचबरोबर बाकी भाजप नेत्यांनी देखील भाष्य केलेलं नाहीये.

तर दुसरीकडे नेमक राज्यात भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यावरच भाजप आमदाराच्या घरासमोर सापडलेली ही बॅग सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ही बॅग कोणी ठेवली? का ठेवली? याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. लवकरच याचा खुलासा होईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
..त्यामुळे फडणवीसांनी जाहीर माफी मागावी, संजय राठोडांना क्लिन चिट मिळताच राष्ट्रवादी आक्रमक
पुण्यात शिवसेना भलमोठं भगदाड! पंढरपूरला जाता जाता मुख्यमंत्र्यांनी दिला जबर धक्का
रवींद्र जडेजाने CSK ला ठोकला रामराम? केले असं काही की चाहत्यांनाही बसला धक्का
आषाढीची महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते होणार; निवडणूक आयोगाने दिली ‘या’ अटींसह परवानगी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now