मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर सक्रिय राहत नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. याद्वारे ती तिचे अनेक पोस्ट शेअर करत असते. यादरम्यान आज प्रार्थनाचा पती अभिषेक जावकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक खास पोस्ट शेअर करत पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडिओत प्रार्थना आणि तिच्या पतीने एकमेकांसोबत घालवलेले खास क्षण दिसून येत आहेत. व्हिडिओ शेअर करत प्रार्थनाने लिहिले की, ‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात तुझ्यापासून होते आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्या नावावर संपते. तू नेहमी माझ्यासाठी खास आहेस. आय लव्ह यू. माझ्या हँडसम पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा’.
प्रार्थनाच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच या व्हिडिओत प्रार्थना आणि अभिषेकचे एकमेकांवरील प्रेम पाहून चाहते लाईकचाही वर्षाव करत आहेत.
प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दिग्दर्शक, निर्माता आणि लेखकसुद्धा आहे. त्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील काही तेलूगू चित्रपटांचे वितरण केले. नुकतीच अभिजीत दिग्दर्शित ‘ग्लिटर ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरीजमध्ये प्रार्थना मुख्य भूमिकेत होती.
प्रार्थनाच्या करियरबाबत बोलायचे झाल्यास तिने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘फुगे’, ‘व्हाट्सअँप लग्न’ या चित्रपटात काम केले.
प्रार्थना सोशल मीडियावर नेहमी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. यामध्ये कधी ती वेस्टर्न लूकमधील तर कधी पारंपारिक लूकमध्ये दिसत असते. साडीमध्ये तर ती लाजवाब दिसत असते. फोटोतील तिच्या हटके लूकची तर नेहमीच चर्चा होत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
‘देवों के देव महादेव’मधील पार्वतीने आतापर्यंत १०० मुलांना लग्नास दिलाय नकार, कारण वाचून अवाक व्हाल
सलमान माझा मोठा भाऊ, मी त्याचा कधीच.., नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर कमाल आर खानचे स्पष्टीकरण
जेव्हा आलिया भट्टने तिच्या बेडरूममधील रहस्य केले उघड, सोशल मिडीयावर उडाली खळबळ