Share

प्रकाश राज यांनी थेट अमित शहांना ट्विट, म्हणाले’ ‘आमची घरं तोडू नका होम मिनिस्टर’

प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज हे सातत्याने केंद्र सरकारवर आणि त्यांच्या धोरणांवर भाष्य करत असतात. आपल्या ट्विटच्या माध्यमातून ते आपले मत सरकारपर्यंत पोहोचवत असतात. नुकेतच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल ट्विटच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. त्यांचे हे ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आहे.

अमित शहा यांनी हिंदी भाषेविषयी आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, हिंदी भाषा ही इंग्रजी भाषेचा पर्याय म्हणून वापरावी, स्थानिक भाषांना पर्याय म्हणून नाही. अमित शाह यांच्या या मतावर अभिनेते प्रकाश राज यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

त्यांनी ट्विट करून अमित शहा यांना विनंती केली आहे. म्हणाले, ‘आमची घरं तोडू नका मिस्टर होम मिनिस्टर. We dare you. हिंदीची बळजबरी थांबवा. आम्हांला आमची विविधता प्रिय आहे, आम्हाला आमच्या मातृभाषेविषयी प्रेम आहे. आम्हाला आमची ओळख प्रिय आहे’, असे प्रकाश राज यांनी लिहिले.

नुकतेच अमित शहा राजभाषेवरील संसदीय समितीच्या 37 व्या बैठकीला उपस्थित होते, त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले आहे की, सरकार चालवण्यासाठी हिंदी ही अधिकृत भाषा आहे आणि यामुळे हिंदीचे महत्त्व नक्कीच वाढेल, आता देशाच्या एकात्मतेचा महत्त्वाचा भाग राजभाषा बनवण्याची वेळ आली आहे.’

तसेच म्हणाले होते की, जेव्हा इतर भाषिक राज्यांतील नागरिक एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ते भारताच्या भाषेत म्हणजे हिंदीतच असले पाहिजे. इंग्रजीचा पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार केला पाहिजे, असे शहा म्हणाले. इतर स्थानिक भाषेतील शब्द स्वीकारून हिंदी भाषेचा वापर केल्याशिवाय त्याचा प्रसार होणार नाही, असे म्हणाले.

त्यामुळे अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर प्रकाश राज यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी आणि अमित शहा यांच्या निर्णयाचा नकार देण्यासाठी ट्विट केलं. त्यांच्या या ट्विटला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रकाश राज यांचे मत सरकार लक्षात घेणार का पाहावे लागेल.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now