एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अखेर कोसळले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार गेले होते. तसेच त्यांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. (prakash raj on uddhav thackeray)
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे फक्त राज्यातच नाही तर देशात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहे, तर भाजपमध्ये मात्र आनंदाची लाट उसळली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आता त्या व्हिडीओ प्रतिक्रिया येत आहे. असे असताना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोलताना फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. सध्या त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
https://twitter.com/prakashraaj/status/1542209174599520256?t=sKUPoAMRwMhfros182DXZQ&s=08
प्रकाश राज यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांचं कौतूक केलं आहे. तसेच भाजपला लक्ष्य सुद्धा केलंय. प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये भाजप नेत्यांना चाणक्य असे म्हटले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केलेले आहे.
उद्धव ठाकरे सर, तुम्ही उत्तम काम केलं आहे. ज्यापद्धतीने तुम्ही राज्यातील परिस्थिती हाताळली, ती पाहता मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठिशी उभे राहतील. आज चाणक्या लाडू खात असले तरी तुमचा प्रामाणिकपणा दिर्घकालीन आहे, असे ट्विट प्रकाश राज यांनी केले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला होता. तसेच उद्धव ठाकरे वारंवार आमदारांना परत येण्याची विनंती करत होते. बसून मार्ग काढू असे म्हणत होते. पण आमदार न आल्यामुळे अखेर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यावर शिंदेंनी पहील्यांदाच दिली प्रतिक्रीया, म्हणाले आमचा फोकस..
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
काॅंग्रेस राष्ट्रवादीमुळे नाही, तर ‘या’ गोष्टीचा राग शिंदेंच्या डोक्यात होता, त्यामुळे त्यांनी बंड केलं