Share

‘हृदयात गोडसे अन् ओठावर गांधी असणाऱ्या नेत्यांना…’ मेवाणीच्या अटकेनंतर प्रकाश राज भडकले

नुकतेच आसाम पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक केली होती. 18 एप्रिल रोजी त्यांना जामीन मिळाला होता, मात्र दुसऱ्या एका प्रकरणात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. या प्रकरणावर आता अभिनेते प्रकाश राज चांगलेच संतापले आहेत.

काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांना दोनदा अटक केल्याने प्रकाश राज चांगलेच भडकले आहेत. प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणावर आपले मत व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या या ट्विटला अनेक राजकीय लोकांनी प्रत्युत्तर दिले आहे, अनेकांनी त्यांच्या या ट्विटचे समर्थन केले आहे.

प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘महात्मा गांधींची हत्या करणारा गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. गोडसेला हृदयात ठेवणाऱ्या आणि गांधींना फक्त ओठावर ठेवणाऱ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. जिग्नेश मेवाणी हिम्मत ठेवा, सत्याचा विजय होईल.’ असे त्यांनी लिहिले.

प्रकाश राज यांनी ट्वीटच्या शेवटी जे हॅशटॅग वापरले त्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. काही लोक गांधी आणि गोडसे यांच्यावरून वाद घालू लागले. शशांक शेखर झाने लिहिले की, ‘जेव्हा कोणता प्रश्नच नाहीए तर विचारता का?’ सत्या पाटीलने लिहिले की, ‘1983 मध्ये काय घडलं, जेव्हा राजीव गांधींच्या काळात अनेक शिखांची हत्या झाली. आज तुम्हाला राजीव गांधी आदर्श वाटतात का?’

तसेच हरीश जोशी नामक व्यक्तीने लिहिले की, ‘मला वाटतं की तुम्ही साक्षीदार आहात आणि तुम्ही खूप जवळून पाहिलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे की गोडसेने गांधींना का मारलं? गोडसेने गांधींना का मारले ते कोणीतरी यांना सांगा. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर अभय तिवारी नावाच्या युझरने लिहिले की, ‘जर मेवानी निर्दोष असेल तर न्यायालयात जा आणि त्याची सुटका करा. कायदा आपलं काम योग्य पद्धतीने करतं आणि तुमच्या इच्छेनुसार किंवा कल्पनेनुसार कोणतं काम होतं नाही’ सध्या प्रकाश राज यांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राजकारण बाॅलीवुड राज्य

Join WhatsApp

Join Now