prakash amabedkar statement on bjp | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच भाजपवरही टीका केली आहे. भाजपला जसे उद्धव ठाकरे नको आहेत, तसेच त्यांना एकनाथ शिंदेही नकोय असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
युती आघाडीमध्ये कोणत्याही एका पक्षाला जागा दिली जाते. त्यानंतर कायम त्याच पक्षाच्या उमेदवाराचा तिथे दावा असतो. त्यामुळे उमेदवार नसलेल्या पक्षाचे कार्यकर्ते तिथे टिकत नाही. त्यामुळे पक्षही संपतो. स्वतंत्रपणे निवडणूका लढवल्या तरच पक्ष टिकतील, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
भाजपला उद्धव ठाकरे नको होते. त्याप्रमाणेच त्यांना एकनाथ शिंदेही नकोय. भाजपला त्यांच्या बाजूने स्थिती दिसली, तर ते निवडणूक लढतील, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. स्थानिक विश्रामगृहात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
नगरपालिका, पंचायत समिती, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर बैठका घेत आहे. त्यामुळे ते यवतमाळमध्ये आले होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक यावेळी पार पडली आहे. यावेळी ८० टक्के बांधणीचे काम पुर्ण झाले आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
युती आघाडीने पक्षांचे नुकसान होत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. काही मतदार संघांमध्ये त्यामुळे पक्षही पुर्णपणे संपलेला आहे. पण लोकशाही टीकवण्यासाठी राजकीय पक्षांची गरज आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना म्हटले आहे.
तसेच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढले तरच टिकतील. युतीमध्ये वारंवार एकाच पक्षाला जागा सुटते. त्यामुळे इतर पक्षांचे कार्यकर्ते टिकत नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या निवडणूकांची घोषणा लवकरच होऊ शकते. त्यामुळे सर्व पक्ष निवडणूकीसाठी कामाला लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी चूक; प्रसिद्ध लेखकाला जिवंतपणीच वाहीली श्रद्धांजली
sharad pawar : बारामतीच्या जाणता राजाने हात लावला तर राख होते; पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत, मशाल चिन्हही हातातून जाणार? प्रकरण उच्च न्यायालयात